राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 21:43 IST2021-09-17T21:43:23+5:302021-09-17T21:43:50+5:30
Nagpur News राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात लवकरच भाजप-शिवसेनेचे सरकार येईल, असा विश्वास रिपाइंचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. ते एका कामानिमित्त नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. (BJP-Shiv Sena government in the state soon)
आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कंटाळले असून ते बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत, तसे संकेत त्यांनी दिले आहेत. महाविकास आघाडी सरकारला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. परंतु हे सरकार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करू शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील असलेला वाद मिटावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सरकार बनवण्याच्या दृष्टीने भाजप नेते आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर एकमेकांशी चर्चा करावी, यासाठी आपण मध्यस्थी करायला तयार असल्याचेही ते म्हणाले.