शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
5
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
6
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
7
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
8
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
9
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
10
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
11
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
12
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
13
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
14
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
15
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
16
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
17
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
18
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
19
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
20
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...

नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी

By योगेश पांडे | Updated: November 14, 2024 06:09 IST

गुडधे यांच्याकडून गल्लीबोळात प्रचारावर भर : लोकसभेनंतर भाजप ॲक्शन मोडवर

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात उपमुख्यमंत्री व पक्षाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस व कॉंग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यात प्रमुख लढत आहे. या जागेवरून फडणवीस यांना विजयी चौकाराची व आमदारकीच्या डबल हॅटट्रीकची संधी आहे. फडणवीस यांच्याकडे राज्यभरातील प्रचाराची धुरा असल्याने ते स्वत:च्या मतदारसंघात संपर्कासाठी हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावरच प्रचार मोहीम सुरू आहे. दुसरीकडे होर्डिंगबाजीमुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत कार्यकर्त्यांकडून गल्लीबोळात जाऊन प्रचारावर भर देण्यात येत आहे. एकूणच या हायप्रोफोईल लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विजयी चौकार तसेच आमदारकीच्या डबल हॅटट्रीकची संधी आहे. मात्र २०१९ ची विधानसभा व लोकसभेतील भाजपच्या घटलेल्या मताधिक्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे नियोजन पणाला लागलेले आहे. दुसरीकडे गुडधे यांच्यासमोर अखेरपर्यंत पक्षातील एकजूट कायम ठेवून लढण्याचे आव्हान आहे.

२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून येथे भाजपचे प्राबल्य आहे. २०१९ मध्ये फडणवीस यांनी येथून विजयाची हॅटट्रिक केली. राज्याच्या राजकारणात व्यस्त असले तरी फडणवीस हे स्वत: नियमितपणे मतदारसंघाचा आढावा घेतात व अगदी सामान्य कार्यकर्त्याच्या घरीदेखील भेट देताना दिसून आले आहेत. येथे भाजपचे मोठे संघटन असून फडणवीस यांच्या अनुपस्थितीत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार सुरू आहे तर गुडधे यांच्यासाठी कॉंग्रेस संघटन गटबाजी दूर सारून एकजूट झाले आहे. २०१४ साली गुडधे फडणवीस यांच्याकडून पराभूत झाले होते. तेव्हाच्या चुका टाळण्याचा ते प्रयत्न करीत आहेत.

वंचित, बसपामुळे मतविभाजन होणार का ?या मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून विनय भांगे तर बसपाकडून सुरेंद्र डोंगरे उभे आहेत. मतदारसंघात प्रामुख्याने खुला प्रवर्ग, ओबीसी, सिंधी व अनुसूचित जातीच्या मतदारांची लक्षणीय संख्या आहे. पांढरपेशांचा मोठ्या प्रमाणात भरणा असलेल्या या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसून येत असली, तरी काही पट्ट्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी व बसपाकडूनही आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये बसपा व वंचित मिळून मतांचा आकडा १६ हजारांच्या आसपास होता हे विशेष.

घटलेले मताधिक्य अन् सक्रिय झालेले कार्यकर्तेयंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपला अतिआत्मविश्वास भोवला. अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०१९ च्या तुलनेत गडकरी यांचे मताधिक्य २१ हजार ५८१ने घटले. मात्र त्यानंतर संघटनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्यात आले. याशिवाय विविध पातळ्यांवर सातत्याने प्रचाराचा आढावा घेण्यात येत आहे.

विधानसभा २०१९देवेंद्र फडणवीस (विजयी) - भाजप - १,०९,२३७आशिष देशमुख - काँग्रेस - ५९,८९३रवी शेंडे - वंचित बहुजन आघाडी - ८,८२१विवेक हाडके - बसप - ७,६४६नोटा : ३,०६४

विधानसभा २०१४देवेंद्र फडणवीस (विजयी) : भाजप : १,१३,९१८प्रफुल्ल गुडधे : काँग्रेस : ५४,९७६डॉ. राजेंद्र पडोळे : बसप : १६,५४०पंजू तोतवानी : शिवसेना : २,७६७दिलीप पनकुले : राष्ट्रवादी : १,०५५

एकूण उमेदवार : १२एकूण मतदार : ४,११,२४१पुरुष मतदार : २,०२,२९८महिला मतदार : २,०८,९१४तृतीयपंथी : २९

भाजपचे मताधिक्य (लोकसभा)वर्ष - मताधिक्य२०२४ : ३३,५३५२०१९ : ५५,११६२०१४ : ६२,७२३

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसnagpur-south-west-acनागपूर दक्षिण पश्चिम