‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, थिएटरमधून काढा; उत्तर भारतीय मोर्चाने केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2023 22:09 IST2023-06-27T22:08:45+5:302023-06-27T22:09:14+5:30
Nagpur News आदिपुरुष सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याचा आरोप करीत थिएटरमधून हा चित्रपट काढा, यासाठी पंचशील थिएटरपुढे भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने आंदोलन केले.

‘आदिपुरुष’ला भाजपचा विरोध, थिएटरमधून काढा; उत्तर भारतीय मोर्चाने केले आंदोलन
नागपूर : आदिपुरुष सिनेमाच्या कथानकापासून वेषभूषा आणि संवादावर आक्षेप घेण्यात आला आहे. इतिहास आणि तथ्याला धरून हा सिनेमा बनवण्यात आला नसल्याचा आरोप करीत थिएटरमधून हा चित्रपट काढा, यासाठी पंचशील थिएटरपुढे भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाने आंदोलन केले. या आंदोलनानंतरही हा चित्रपट बंद न झाल्यास चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा लेखक मनोज मुंतशीर, अभिनेता प्रभास यांच्याविरोधात पोलिसात एफआयआर करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष सुरेंद्र पांडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी थिएटरपुढे हनुमान चालिसाचे पठण केले. आंदोलनात सुधीर श्रीवास्तव, आशिष पांडे, संजय सिन्हा, शत्रुघ्न तिवारी, लालचंद मिश्र, वैभव शर्मा आदी सहभागी झाले होते.