शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

जिंकूनही भाजप संतुष्ट नाही : सर्व बूथ नव्याने बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 00:23 IST

लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविस्तारक, शक्तिप्रमुख, बूथप्रमुखही बदलणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपुरातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख १६ हजार ९ मतांच्या अंतराने जिंकले. तसेच भाजपचे मतदान वाढल्यानंतरही २०१४ च्या तुलनेत विजयाची लीड कमी झाल्याने पक्ष चिंतेत आहे. अशा परिस्थितीत पक्षाने विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटनेला आणखी मजबूत करण्यासाठी शहरातील प्रत्येक बूथचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे.नागपुरातून भाजपने सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. नितीन गडकरी यांना एकूण ६,६०,२२१ मते मिळाली, तर काँग्रेसचे नाना पटोले हे केवळ ४,४४,२१२ मतांपर्यंत मजल मारू शकले. लोकसभेच्या सहापैकी पाच विधानसभा मतदार संघात गडकरी आघाडीवर राहिले. उत्तर नागपुरात पटोले आघाडी घेण्यात यशस्वी राहिले. भाजपने या निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सोमवारी धंतोली येथील विभागीय कार्यालयात आयोजित बैठकीत विचारमंथन केले. संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर प्रवीण दटके, मनपा सत्तापक्ष नेते व शहर महामंत्री संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटन मंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. आ. कोहळे यांनी बैठकीनंतर सांगितले की, लोकसभा निवडणुकीत संघटन संरचनेंतर्गत विस्तारक, शक्तिप्रमुख, बूथप्रमुख आदींना जबाबदारी सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी लोकसभा निवडणुकीपर्यंत मर्यादित होती. पक्षाने निवडणुकीनंतर शहरातील प्रत्येक बूथवर चिंतन-मनन केले. यानंतर बैठकीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व बूथचे नव्याने गठन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विस्तारक, शक्तिप्रमुखांनाही बदलविण्यात येईल.भाजप सूत्रानुसार ज्या बूथवर गडकरी यांना अपेक्षेनुसार मते मिळाली नाहीत तेथील पदाधिकाऱ्यांना हटविण्यात येईल. यात त्या बूथचाही समावेश आहे, जिथे गडकरी समोर आहेत, परंतु त्यांना तिथे अपेक्षित मते मिळालेली नाही. सूत्राचा दावा आहे की, पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागाचाही आढावा घेतला जात आहे. अपेक्षित यश न मिळविणाºयांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण