शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
5
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
6
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
7
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
9
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
10
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
11
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
12
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
13
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
14
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
15
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
16
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
17
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
18
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
19
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
20
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 06:40 IST

ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही, मंत्र्यांचा खुलासा

नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे व प्रवीण दटके यांनी स्मार्ट सिटी प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप केलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चिट मिळाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) व पोलिस अशा दोन एजन्सींनी चौकशी केली आहे. त्यांनी त्यांच्या अहवालात चुकीचे काहीच आढळले नसल्याचे नमूद करीत क्लीन चीट दिली आहे, असे  उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. महिला आयोगाकडे एक चौकशी सुरू आहे. त्याचा अहवाल महिनाभरात येईल व त्यानुसार पुढील कारवाई करू, असेही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता

    भाजपचे आ. कृष्णा खोपडे व आ. प्रवीण दटके यांनी नागपूर महापालिकेचे माजी आयुक्त असताना तुकाराम मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अंदाजे २० कोटींच्यावर गैरव्यवहार केल्याची तक्रार लक्षवेधी सूचना मांडत केली. त्यावेळेसचे महापौर, सत्तापक्षाचे नेते यांनी सर्व कागदपत्रांसहीत सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला. पोलिस विभागातर्फे या प्रकरणी कार्यवाही झाली नाही.

मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पामधील दोन महिला अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून अभद्र व्यवहार केला. या महिला अधिकाऱ्यांनी सदर पोलिसात तक्रार केल्याने मुंढेंवर गुन्हा दाखल झाला, असे सांगत आ. खोपडे यांनी मुंढे यांना तातडीने बडतर्फ करून मुख्य सचिव व पोलिस महासंचालकामार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरली.     यावर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, मुंडे यांच्या सीईओ म्हणून नियुक्तीला तत्कालीन आयुक्तांनी मंजुरी दिली होती. केलेल्या कामांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कार्योत्तर मंजुरी दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांची सहीदेखील आहे.

२० कोटींच्या बिलाबाबत ईओडब्ल्यू व पोलिसांमार्फत दोन चौकशी सुरू होत्या. मुंढे यांनी स्वत:च्या अधिकाराचा गैरवापर करून काही केले असे दिसत नाही. योग्य प्रक्रिया राबवूनच बिल काढले होते. कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असा अहवाल देत ईओडब्ल्यू व पोलिस या दोन्ही एजन्सींनी त्यांना क्लीन चीट दिली आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आ. दटके यांच्या मागणीची दखल घेत दोन्ही एजन्सीचे चौकशी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवले जातील, असेही त्यांनी आश्वस्त केले.

वडेट्टीवारांचे भाजप आमदारांना चिमटे 

मुंढे यांना मंत्र्यांनी क्लीन चीट दिल्यानंतर आ. विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदारांना चिमटे काढले. ते म्हणाले, मंत्री म्हणतात चौकशी झाली, निर्दोष आढळले.  आता हे प्रकरण एकदाचे ईडी, सीबीआयकडे पाठवून द्या. स्पेशल फोर्स नेमा. तेव्हा तुमचे समाधान होईल.  आमदार बॉल टाकताहेत, मंत्री टोलवताहेत. एकदाचा सोक्षमोक्ष करा, असे टोले वडेट्टीवारांनी लगावले. विशेष म्हणजे गुरुवारी विधानसभेत हा विषय आला असता वडेट्टीवारांनी मुंढे यांची बाजू घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Tukaram Mundhe cleared of corruption charges by BJP MLAs: Report

Web Summary : IAS officer Tukaram Mundhe received a clean chit in the Smart City case after investigations found no wrongdoing. Allegations by BJP MLAs were dismissed.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनtukaram mundheतुकाराम मुंढे