शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निकालापूर्वीच भाजपचा नगराध्यक्ष घोषित ? आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:08 IST

Nagpur : मनोज कोरडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय चरडे यांचा आचारसंहिता भंगाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : नरखेड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अवमान करणारा प्रकार भाजपकडून उघडकीस आला. नगराध्यक्ष पदाचा अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच भाजपचे उमेदवार मनोज कोरडे यांचा नगराध्यक्ष म्हणून प्रचार करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी केला आहे. हा प्रकार केवळ आचारसंहितेचा उघड भंग नसून, मतदारांवर दबाव निर्माण करणारा आणि निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता धोक्यात आणणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

नरखेड नगरपरिषदेचे मतदान २ डिसेंबर रोजी झाली. न्यायालयीन कारणांमुळे प्रभाग क्रमांक २ ब, ५ ब आणि ७ अ येथील मतदान लांबणीवर पडले. या तीन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. असे असतानाही भाजपकडून प्रचार फलकांवर नगराध्यक्ष मनोज कोरडे असा उल्लेख करून थेट निकालावर शिक्कामोर्तब केल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

लांबणीवर पडलेल्या जागांसाठी सरू असलेल्या प्रचारादरम्यान भाजपने निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवून, जनमताला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मतदारांना चुकीचा संदेश देणारा असल्याचा आरोप करत. संबंधित प्रचार फलकांचे प्रकाशक, संबंधित व्यक्ती व उमेदवार यांच्यावर आचारसंहिता नियमांनुसार तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहर अध्यक्ष संजय चरडे यांनी नरखेडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख यांनी लागणारा निकाल हा पूर्वनियोजित तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. तसेच प्रशासन निवडणुकीत भाजपला जास्त झुकते माप देत असल्याचा आरोप केला.

नियमानुसार कारवाई होणार : खोडके

राष्ट्रवादीकडून संबंधित तक्रार दाखल झाली आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमेश खोडके यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Declares Nagpur Mayor Before Results? Code of Conduct Violated.

Web Summary : NCP alleges BJP prematurely promoted its candidate as mayor in Narkhed, even before final votes are cast. This violates election rules and pressures voters, jeopardizing impartiality. An investigation is underway following the complaint.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकnagpurनागपूरBJPभाजपा