भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया संघस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 14:49 IST2020-08-25T14:43:32+5:302020-08-25T14:49:49+5:30

काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरची त्यांची हा पहिलाच नागपूर दौरा ठरला.

BJP leader Jyotiraditya Scindia in Sanghsthani | भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया संघस्थानी

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया संघस्थानी


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झालेले खा. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी संघस्थानी भेट दिली. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरची त्यांची हा पहिलाच नागपूर दौरा ठरला.

सर्वात अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यांनतर ते रेशीमबाग येतील स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. तेथे त्यांनी हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोलवळकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

डॉ हेडगेवार यांचे निवासस्थान राष्ट्रासाठी समर्पण दाखवणारे स्थान आहे. इथे येऊन प्रेरणा मिळते. त्यामुळे येथे नमन करायला आलो आहे. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर मी बोलणार नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे असे मत सिंधिया यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP leader Jyotiraditya Scindia in Sanghsthani