काटाेल पालिकेत भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:07+5:302021-02-23T04:14:07+5:30

सार्वजनिक लोकनिर्माण समितीच्या सभापतिपदी किशोर गाढवे यांची तर सदस्यपदी जितेंद्र तुपकर, माया शेरेकर, प्रसन्न श्रीपदवार, सुकुमार घोडे यांची निवड ...

BJP dominates in Katail municipality | काटाेल पालिकेत भाजपचे वर्चस्व

काटाेल पालिकेत भाजपचे वर्चस्व

सार्वजनिक लोकनिर्माण समितीच्या सभापतिपदी किशोर गाढवे यांची तर सदस्यपदी जितेंद्र तुपकर, माया शेरेकर, प्रसन्न श्रीपदवार, सुकुमार घोडे यांची निवड करण्यात आली. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतिपदी देवीदास कठाणे तर सदस्यपदी प्रसन्न श्रीपदवार, जयश्री भुरसे, लता कडू, संगीता हरजाल यांची स्वच्छता, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापतिपदी शालिनी बन्सोड तर सदस्यपदी लता कडू, माया शेरेकर, वनिता रेवतकर, सुकुमार घोडे यांची निवड करण्यात आली. पेयजल आपूर्ती, जल निस्सारण समिती सभापतिपदी सुभाष कोठे तर सदस्यपदी माया शेरेकर, संगीता हरजाल, राजू चरडे, जयश्री भुरसे यांनी निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती सभापतिपदी मनोज पेंदाम यांनी तर सदस्यपदी प्रसन्न श्रीपदवार, सुकुमार घोडे, वनिता रेवतकर, लता कडू, महिला व बालकल्याण सभापतिपदी शालिनी महाजन यांची तर या समितीच्या सदस्यपदी माया शेरेकर, संगीता हरजाल, लता कडू, जयश्री भुरसे यांची निवड करण्यात आली. या सभेला नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष सुभाष कोठे, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह नगरसेवक उपस्थित हाेते.

Web Title: BJP dominates in Katail municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.