शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांच्या कक्षापुढे भाजप नगरसेवकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 01:08 IST

कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.

ठळक मुद्देपाणी दरवाढ मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाणीदरात करण्यात आलेली पाच टक्के दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करीत महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कक्षाबाहेर धरणे दिले.२०१२ मध्ये महापालिका सभागृहात पाणीपट्टीत दरवर्षी पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही दरवाढ केली जाते. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या संकटामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडाला, सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत मनपा प्रशासनाने पाणी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी. आमदार प्रवीण दटके सत्तापक्ष नेते संदीप जाधव ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी आदींनी यावेळी केली. आंदोलनात मनपातील पदाधिकाऱ्यांसह ५० ते ६० नगरसेवक सहभागी झाले होते.आंदोलनाबाबत नगरसेवकांत संभ्रमकरण्यात आलेली पाच टक्के पाणी दरवाढ मागे घ्यावी, यासाठी २० ऑगस्ट रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला जाणार आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली, तरच दरवाढ मागे घेता येईल, अशी भूमिका आयुक्तांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे. परंतु सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वीच आंदोलन केल्याने काही नगरसेवक संभ्रमात होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनWaterपाणी