शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात भाजपचा सात आमदारांवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 00:15 IST

भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुधाकर कोहळे यांचे कटले तिकीटपोतदार यांना प्रथमच उमेदवारीकामठी, काटोल, रामटेकची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत नागपूर जिल्ह्यातील १२ पैकी नऊ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात सात आमदारांवर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे मात्र तिकीट कटले आहे. अद्यापही कामठी, काटोल, रामटेक या तीन जागांचे उमेदवार जाहीर न झाल्यामुळे विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार सुधाकर देशमुख (नागपूर-पश्चिम), कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), विकास कुंभारे (नागपूर-मध्य), डॉ.मिलिंद माने (नागपूर-उत्तर) यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागेवर माजी आमदार मोहन मते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.नागपूर ग्रामीणमधील सहापैकी तीनच जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान, हिंगण्यातून विद्यमान आमदार समीर मेघे, उमरेडहून सुधीर पारवे यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. तर सावनेर मतदारसंघातून भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांना संधी देण्यात आली आहे.चर्चांना पूर्णविरामलोकसभा निवडणुकांनंतर काही मतदारसंघात भाजपची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे काही आमदारांचा पत्ता कट होतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मंगळवारी जाहीर झालेल्या यादीमुळे सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. दक्षिणची जागा वगळता शहरातील सर्वच जागांवरील विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम आहे.असे आहेत उमेदवारजागा                                उमेदवारनागपूर दक्षिण पश्चिम     देवेंद्र फडणवीसनागपूर मध्य                 विकास कुंभारेनागपूर पूर्व                   कृष्णा खोपड़ेनागपूर उत्तर               डॉ. मिलिंद मानेनागपूर दक्षिण            मोहन मतेनागपूर पश्चिम            सुधाकर देशमुखउमरेड                     सुधीर पारवेहिंगणा                     समीर मेघेसावनेर                     डॉ. राजीव पोतदारपालकमंत्री बावनकुळे, कामठी की काटोल ?राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीचे आमदार आहेत. परंतु तेथील उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे बावनकुळे यांना कामठी मिळणार की ते काटोलमधून लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार बावनकुळे यांना काटोलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात. त्यामुळे विजयासाठी राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांना काटोलमधून उमेदवारी देण्याावर पक्षात मंथन सुरू आहे. दरम्यान, रामटेकसाठी विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. याशिवाय तिसराच उमेदवार वेळेवरच जाहीर करून धक्कातंत्रदेखील वापरण्यात येण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.पालकमंत्री बावनकुळे, कामठी की काटोल ?राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठीचे आमदार आहेत. परंतु तेथील उमेदवारच जाहीर झालेला नाही. त्यामुळे बावनकुळे यांना कामठी मिळणार की ते काटोलमधून लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार बावनकुळे यांना काटोलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात मते मिळू शकतात. त्यामुळे विजयासाठी राजकीय समीकरणे लक्षात घेता त्यांना काटोलमधून उमेदवारी देण्याावर पक्षात मंथन सुरू आहे. दरम्यान, रामटेकसाठी विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. याशिवाय तिसराच उमेदवार वेळेवरच जाहीर करून धक्कातंत्रदेखील वापरण्यात येण्याची शक्यता नाकारू शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाnagpurनागपूर