लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ नागपुरात भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.रा.स्व. संघ कार्यालयाजवळ महाल भागातील बडकस चौकात मंगळवारी सकाळी भाजप व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यावेळी या परिसरात कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखले जात नसल्याचेही निदर्शनास आले.काय आहे घटना?विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव सोमवारी सभागृहात बोलत असताना विरोधी बाकांवरील सदस्यांनी गोंधळ घातला. अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. ते बोलत असलेला माईकही ओढला गेला. सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर तालिका अध्यक्षांना आईबहिणीवरून शिव्या देण्यात आल्या. या आगळिकीमुळे भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते.
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांचे नागपुरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 10:45 IST
Nagpur News विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ नागपुरात भाजपा व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.
१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांचे नागपुरात आंदोलन
ठळक मुद्देसरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळलाफिजिकल डिस्टन्सिंग धाब्यावर