नागपुरात बिस्किट कंपनीच्या बसला धडक; ४० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 15:24 IST2020-12-05T15:23:48+5:302020-12-05T15:24:09+5:30
Nagpur News accident नागपूर सावनेर महामार्गावर असलेल्या सुंदर बिस्किट या कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रकने धडक दिली.

नागपुरात बिस्किट कंपनीच्या बसला धडक; ४० जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपूर सावनेर महामार्गावर असलेल्या सुंदर बिस्किट या कंपनीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला शनिवारी सकाळी ट्रकने धडक दिली. या अपघातात ४० कामगार जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५५ कर्मचारी होते. जखमींपैकी पाच कामगारांची स्थिती गंभीर आहे. सर्व जखमींना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे सर्व कामगार कंपनीच्या बसमधून जात असताना मॉडर्न स्कूल चौकात ट्रकने या बसला धडक दिली. या अपघातात जखमी झालेले बहुतेक कामगार हे परप्रांतीय आहेत.