शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

जैवविविधता दिन; अंबाझरी जैवविविधता उद्यानाला वैविध्याचे कोंदण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 08:39 IST

हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आपल्या नागपूरच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे!

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिरवीगार वनराई, विस्तीर्ण तलाव, त्या जलाशयात १६ प्रजातींचे मासे, पक्ष्यांचा मंजूळ आवाज, अवतीभवती भिरभिरणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, विविध रंगीबेरंगी पक्षी, मुक्कामाला आलेले पाहुणे पक्षी अन् हे कमी की काय म्हणून १५ प्रकारच्या गवती प्रजाती! हे वर्णन आहे आपल्या नागपूरच्या अंबाझरी जैवविविधता उद्यानाचे!नागपूर शहरावर निसर्गाचा वरदहस्तच आहे. वनराई मनाला भुरळ घालावी, अशीच आहे. शहराच्या पश्चिम-दक्षिणेकडील गोरेवाडा जंगलाची सीमा थेट नागपूर शहराला भिडते. याच सीमेलगत अंबाझरी तलाव आपल्या गतकालीन वैभवाची साक्ष देत आहे. सन १८७० मध्ये भोसलेशाहीच्या काळात नागपूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अंबाझरी तलावाची निर्मिती करण्यात आली.हा प्रकल्प ७५८.७४ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रामध्ये पसरला आहे. याला जैवविविधता प्रकल्प म्हणून २०१६ मध्ये डीपीआर अंतर्गत मंजुरी मिळाली. पुढे जानेवारी २०१६ मध्ये भूमिपूजन झाले. भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २० अंतर्गत २०१७ मध्ये हे क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यात आले. नंतर १४ जुलै २०१७ मध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना झाली. जुलै २०१९ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण झाले.सर्वांगसुंदर प्रकल्पनिसर्गाने मुक्त हस्ताने येथे उधळण केली आहे. या ठिकाणी १५ प्रकारच्या गवती प्रजाती आहेत. ४५० प्रकारच्या वनस्पती आणि ७० प्रकारचे वृक्ष आहेत. पक्षिवैविध्यही आहे. एकूण १६१ प्रजातींच्या पक्ष्यांचा येथे वावर असून १०५ पक्षी निवासी तर ४० स्थलांतरित पक्ष्यांचा वावर असतो. अंबाझरी तलावामध्ये १६ प्रजातींचे मासे आढळतात. फुलपाखरांच्या विविध प्रजातीही हमखास आढळतात. १०४ प्रकारची फुलपाखरे येथे मुक्तपणे भिरभिरत असतात.हे आहेत धोकेया उद्यानाला सर्वाधिक धोका आगीचा आहे. या वनक्षेत्रातून उच्च दाबाची वीजवाहिनी गेली आहे. त्यामुळे आगीचा धोका कायम असतो. उद्यानाचे क्षेत्र मोठे आहे. बरेचदा घुसखोरी होते. अवैध मासेमारीचे प्रकार घडतात. सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पथक गस्तीवर असते. नाल्याच्या काठावरून माणसे आत प्रवेश करतात.

वन्यप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक येथे परवानगी घेऊन येत असतात. मात्र लॉकडाऊनपासून हा प्रकल्प बंद आहे. वन्यजीवांचा मुक्तसंचार आता अधिकच वाढला आहे. प्रदूषणात घट झाल्याने सकारात्मक परिणाम येथील वातावरणावर पडल्याचे डेप्यूटी कंझर्व्हेटर आॅफ फॉरेस्ट नागपूर प्रभू नाथ शुक्ल यांनी सांगितले.

या उद्यानाचे नागपूरच्या पर्यावरणात मोठे महत्त्व आहे. औद्योगिकीकरण प्रचंड वाढले आहे. पर्यावरणातील संतुलन कायम राखण्यात हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. शुद्ध हवा, प्राणवायू मोठ्या प्रमाणावर येथे असल्याने सकाळी फिरणाऱ्यांची संख्याही या परिसरात कमी नाही.जैवविविधतेचे अनेक पैलू आहेत. त्याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. अनेक प्राणी आणि पक्षी कमी होत आहेत. एकेकाळी तडस आणि लांडगे जंगलात मोठ्या प्रमाणावर होते. आज त्यांची संख्या घटली आहे. शहराभोवताल असलेल्या तलावांची संख्या घटली आहे. त्याचा परिणाम वन्य-जीवनमानावर होत आहे. जैवविविधतेत पूरक असणाºया अशा तलावांचे पुनरुज्जीवन व्हावे.- विनीत अरोरा, सेक्रेटरी सृष्टी पर्यावरण मंडलइस्रोच्या अहवालानुसार, पृथ्वीवरचे हिरवे आच्छादन घटत आहे. तलावांची संख्यादेखील घटतेय. नागपूरचा विचार केला तर आज फक्त चार तलाव शिल्लक आहेत. अंबाझरी तलाव आज ९९ टक्के सुरक्षित आहे. असे असले तरी तेथील अडचणी सरकारने लक्ष घालून दूर कराव्यात.- जयदीप दास, मानद वन्यजीव रक्षक

 

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवस