शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

व्हेंटिलेटर न लावताही लावले बिल : मृताच्या मुलाची मनपाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 10:00 PM

Ventilator Bill, Corona Virus, Hospital, Nagpur News खासगी कोविड हॉस्पिटलमधील एका रुग्णाला व्हेंटिलेटर न लावताही ९ हजाराप्रमाणे बिल काढले, सोबतच पाच दिवसांचा पीपीर्ई किटचा खर्च ३३ हजार तर ५० हजार रुपयांच्या चाचण्या केल्या. याबाबतची तक्रार मृत रुग्णाच्या मुलाने महानगरपालिकेकडे ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु अद्यापही कोणीच उत्तर दिले नाही. यामुळे खासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देखासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी कोविड हॉस्पिटलमधील एका रुग्णाला व्हेंटिलेटर न लावताही ९ हजाराप्रमाणे बिल काढले, सोबतच पाच दिवसांचा पीपीर्ई किटचा खर्च ३३ हजार तर ५० हजार रुपयांच्या चाचण्या केल्या. याबाबतची तक्रार मृत रुग्णाच्या मुलाने महानगरपालिकेकडे ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु अद्यापही कोणीच उत्तर दिले नाही. यामुळे खासगी हॉस्पिटलवर वचक कुणाचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.अ‍ॅड. मनोज खोब्रागडे यांनी सांगितले, ६९ वर्षीय वडील मुनेश्वर खोब्रागडे यांना १८ ऑगस्ट रोजी रेडियन्स हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डात भरती केले. १९ ऑगस्ट रोजी तेथून त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल केले. उपचारादरम्यान २३ ऑगस्ट रोजी वडिलांचा मृत्यू झाला. शासनाने खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरशिवाय अतिदक्षता विभागाचा प्रतिदिवसाचा खर्च ७ हजार ५०० तर व्हेंटिलेटरसह अतिदक्षता विभागाचा खर्च ९ हजाराचा दर ठरवून दिला आहे. परंतु वडिलांना पहिल्या दिवशी सामान्य वॉर्डात ठेवले असतानाही आयसीयूचे दर लावले. येथे व्हेंटिलेटर न लावताही व्हेंटिलेटरचा दर आकारण्यात आला. शासकीय दरानुसार सामान्य वॉर्डातील पीपीई किटचा खर्च ६०० रुपये तर आयसीयूचा १२०० रुपये असताना पाच दिवसांचे ३३००० शुल्क आकारण्यात आले. औषधांमध्येही ७,८५० रुपये जास्तीचे घेतले. ज्या चाचण्यांचे बिल लावले त्याचे रिपोर्ट फार्ईलमधून गायब होते. या विषयी तक्रार केल्यावर नंतर फार्ईलमध्ये लावण्यात आले. पाच दिवसांत ५० हजार रुपयांच्या चाचण्या करण्यात आल्या. वडिलांच्या अचानक मृत्यूने बिल न पाहता हॉस्पिटलचे शुल्क पूर्ण भरले. यात हॉस्पिटलने २१ हजार रुपयांची सूटही दिली. परंतु नंतर बिल तपासले असता, शासकीय दरानुसार ८० हजार ६५० रुपये शुल्क झाले असताना १ लाख भरल्याचे लक्षात आले. याची तक्रार मनपा आयुक्त यांना ११ सप्टेंबर रोजी केली. परंतु उत्तर मिळाले नसल्याचे अ‍ॅड. खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. हॉस्पिटलमधील वॉर्डातील शौचालयात पाणी, साबण व सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.रुग्णाला छोटे व्हेंटिलेटर लावण्यात आले होतेरुग्णाला छोटे व्हेंटिलेटर म्हणजे ‘बायपॅक’ लावण्यात आले होते. प्रत्येक उपचारापूर्वी रुग्णाचा मुलगा अ‍ॅड. खोब्रागडे यांची संमती घेतली जात होती. एकूण खर्चाच्या शुल्कातून २१ हजार रुपयांची सूटही देण्यात आली. त्यानंतरही मनपाच्या अधिकाऱ्याने ११ हजार रुपये परत करण्यास सांगितले, लवकरच ही रक्कमही त्यांना परत केली जाईल.डॉ. मनोज पुरोहितसंचालक, रेडिएन्स हॉस्पिटल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल