नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 14:30 IST2018-02-09T14:30:00+5:302018-02-09T14:30:18+5:30
भरधाव क्रशरच्या चालकाने धडक दिल्यामुळे नागपुरात दुचाकीवरील तरुणाचा करुण अंत झाला.

नागपुरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीचालकाचा करुण अंत
ठळक मुद्देअपघातात हेल्मेटचे झाले दोन तुकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भरधाव क्रशरच्या चालकाने धडक दिल्यामुळे नागपुरात दुचाकीवरील तरुणाचा करुण अंत झाला. नितीन राऊत असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३५ च्या सुमारास धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेसनगर चौकाजवळ हा भीषण अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच धंतोलीचा पोलीस ताफा तेथे पोहचला. सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.