टाटा एक्सलच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: December 26, 2023 14:34 IST2023-12-26T14:33:50+5:302023-12-26T14:34:09+5:30
वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून गाडीला धडक

टाटा एक्सलच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
नागपूर : टाटा एक्सल वाहनाने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील ३२ वर्षीय व्यक्ती खाली पडून जखमी झाल्याची घटना यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
मन्नु उर्फ विवेक राजु रयतवार (वय ३२, रा. पांडे वस्ती, यशोधरानगर) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते आपल्या मित्रासोबत प्लेझर गाडी क्रमांक एम. एच. ३१, एस. डब्ल्यू-९४१० ने प्रधानमंत्री आवास योजना चौक रोडने जात होते. टाटा एक्सल गाडी क्रमांक एम. एच. ४०, बी. एल-०३७० च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या गाडीला धडक दिली. यात ते खाली पडून त्यांच्या पायाला, हाताला व चेहऱ्याला दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.