उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST2021-01-25T04:09:30+5:302021-01-25T04:09:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : भरधाव दुचाकीची रस्त्यात उभा असलेल्या ट्रकला धडक लागली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा ...

The bike collided with a vertical truck | उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

उभ्या ट्रकवर दुचाकी धडकली

लाेकमत न्यूज नेटवर्क

पारशिवनी : भरधाव दुचाकीची रस्त्यात उभा असलेल्या ट्रकला धडक लागली. त्यात गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी-सावनेर मार्गावरील सावळी शिवारात शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

अमाेल सेवकराम वाकाेडे (३४, रा. पारशिवनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ताे सावनेर येथे दुचाकी दुरुस्तीचे दुकान चालवित हाेता व दरराेज सावनेर येथे ये-जा करीत हाेता. शुक्रवारी सायंकाळी काम आटाेपून ताे एमएच-४९/एआर-४०५२ क्रमांकाच्या दुचाकीने पारशिवनी येथे येत हाेता. यादरम्यान सावळी शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या एमएच-४०/वाय-८३२९ क्रमांकाच्या ट्रकला धडक लागली. त्यात अमाेलच्या डाेक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिका बाेलावून त्याला पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले.

विशेष म्हणजे, सदर ट्रक हा दाेन दिवसांपासून तेथेच उभा हाेता. इंडिकेटर, रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट बंद हाेते. घटनास्थळी रस्त्यावर थाेडे वळण असल्याने ट्रक नजरेस पडत नव्हता. यामुळे हा अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.

Web Title: The bike collided with a vertical truck