शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बाहुला-बाहुलीच्या लग्नात चिमुकल्यांची धम्माल

By admin | Updated: May 24, 2014 01:04 IST

मराठी गीतांची वाजंत्री...वर पक्षाकडून निघालेली वरात अन् वरातीत गीतांचा ठेका पकडून नाचणारे चिमुकले...वरातीत त्यांचे पालकही सहभागी झालेले...सारे काही सुरळीत सुरू होते. कुणाचा रुसवा नाही की,

बालजगत : चॉकलेट अन् बिस्किटचा अहेर आणि वरातीत नृत्य

नागपूर : मराठी गीतांची वाजंत्री...वर पक्षाकडून निघालेली वरात अन् वरातीत गीतांचा ठेका पकडून नाचणारे चिमुकले...वरातीत त्यांचे पालकही सहभागी झालेले...सारे काही सुरळीत सुरू होते. कुणाचा रुसवा नाही की, फुगवा नाही. वरपक्षाकडील मंडळीही वधुपक्षाच्या लोकांना मदत करणारीच होती. मंगलाष्टके झालीत, सुलग्न लागले आणि बाहुला-बाहुलीच्यावतीने मस्तपैकी उखाण्यांचीही मैफिल रंगली. यात सारेच सहभागी झाले. हसत -खेळत बाहुला-बाहुलीचे लग्न झाले आणि नांदा सौख्यभरे म्हणत चिमुकल्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. धम्माल करीत हा विवाह सोहळा आनंदात पार पडला. दीनदयाल शोध संस्थान, बालजगतच्या उन्हाळी शिबिरात हा सोहळा तब्बल हजारावर मुले आणि पालकांच्या साक्षीने पार पडला. हा कार्यक्रम बालजगत, लक्ष्मीनगरच्या आवारात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अख्खे बालजगत सजविण्यात आले. वरपक्षाला कुठलाही त्रास नको म्हणून जागोजागी सर्व व्यवस्था सज्ज होत्या. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने मुद्दामच हा सोहळा सायंकाळी आयोजित करण्यात आला. विवाहासाठी बालजगतच्या हिरवळीवर छानसा स्टेज तयार करण्यात आला होता. वय वर्षे २ ते ५ हा शिशुरंजन आणि ५ ते १० हा बालरंजन असे दोन समूह तयार करण्यात आले होते. शिशुरंजनने वधु पक्षाची जय्यत तयारी केली होती. नवरदेवासाठी पालखी तयार करण्यात आली. पालखीतून बाहेर पाहताना कधी-कधी नवरदेवाचा तोल जात होता पण त्याला सार्‍यांनीच सांभाळले. वरपक्षाकडचे ताई - दादाही वधुपक्षाच्या मदतीसाठी सज्ज असल्याने कुठेही - काहीही गोंधळ झाला नाही. आई, बाबा आणि आजी- आजोबांसाठी या सोहळ्यात विशेष सोय करण्यात आली होती. मंगलाष्टके झाली, बँड वाजला, नृत्य करण्यात आले. यात सारे पालकही वय विसरून सहभागी झाले. पण त्यानंतर अहेर करण्यात आला. अहेरात चॉकलेट आणि बिस्कीट होते. अहेराचे वितरण सुरू असताना नवरदेवाकडच्या काही मंडळींना चॉकलेट मिळालेच नाही. बिस्किट मिळाले. हा अर्धाच अहेर मिळालेला पाहून नवरदेवाकडची काही मंडळी रुसली. आता मोठा पेच पडला. कारण अहेराची सामग्री संपली होती. पण वधुपक्षाने हार मानली नाही. त्वरित वधुपक्षाचे पालकत्व स्वीकारलेल्या जगदीश सुकळीकरांना साकडे टाकले आणि त्यांनी पुन्हा व्यवस्था केली. जगदीश सुकळीकरांच्या आशीर्वादाने मग सारेच सुरळीत झाले. सर्वांनाच चॉकलेट मिळाले. त्यानंतर आग्रहाने सगळ्यांना नाश्ता देण्यात आला. या सोहळ्यासाठी बालजगतचे प्रांगण फुलले होते. मुले-मुली आकर्षक रंगीबेरंगी पोशाख आणि सुगंधी अत्तर लावून आले होते. लहान मुलांच्या या लुटुपूटुच्या लग्नात मोठेही हरविले. अनेकांना त्यांच्याही लहानपणीचे खेळ आठवले. (प्रतिनिधी)