शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

नागपुरात उत्साहात साजरा झाला मोठा बैल पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:59 IST

ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला.

ठळक मुद्देपारडी, काछीपुरा, बोरगावमध्ये भरला पारंपरिक पोळा : झडत्या आणि मिरवणुकीने भरला उत्साह

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : डेरेदार शिंगावर मोरपिसांचा तुरा, गळ्यात घुंगरांच्या माळा, पाठीवर नक्षीदार झुल असा साजशृंगार करून सर्जा राजांच्या जोड्या पोळ्यात मोठ्या तोऱ्यात उभ्या होत्या. एक नमन गौरा पारबती हरबोला हर महादेव म्हणत पोळ्यात झडत्यांनी रंगत आणली होती. सजलेल्या सर्जाराजाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. नैवेद्यरुपात त्याला पंचपक्वान खाऊ घालण्यात आले. ईडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे... अशी आर्त हाक मोठ्या बैल पोळ्याच्या निमित्त घालण्यात आली. शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लहानथोरांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात बैल पौळा साजरा झाला.

 पारडीच्या पोळ्याला १५१ वर्षाची परंपरापारडीमध्ये भरणाऱ्या पोळ्याला १५१ वर्षाची परंपरा लाभली आहे. या पोळ्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. या पोळ्यात परिसरातील गावातून ५०० च्यावर नंदीबैलांच्या जोड्या सहभागी झाल्या होत्या. या जोड्या बघण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक पारडीत जमले होते. यावेळी काही युवकांनी शारीरिक कवायतीही सादर केल्या. पारडी दुकानदारासंघाच्या वतीने बर्फाची भव्य शिवपिंड तयार केली होती. यानिमित्त मेळावासुद्धा भरला होता. आयोजकांनी प्रत्येक जोडीचे पूजन करून, आकर्षक दिसणाऱ्या जोडीला पुरस्कार देऊन गौरव केला. या आयोजनात माजी नगरसेवक देवेंद्र मेहर, महादेव मेहर, गजानन भजभुजे, शकील शेख, पुरुषोत्तम मंदीरकर, विनोद मानकर, विनय भुरे, पांडुरंग मेहर, विठ्ठल मेहर, श्रीकांत लारोकर, प्रवीण मल्लेवार, दिलीप बारसागडे, सौरभ वरखडे, रवी मेहर, चरणदास बावणे, विकास मेहर, शैलेश मेहर, कैलास खंडाळे, गजानन डोंगरे, वालिदास चवारे, देवेंद्र लांजेवार, दिनेश देशमुख, अखिल चवारे, भय्यालाल बिसेन, वामनराव मेश्राम, राजेश गिरीपुंजे, बंडू बोंद्रे, मनोज आतिलकर, सुधीर मानवटकर आदींचे सहकार्य लाभले.काछीपुऱ्यातही रंगला बैल पोळा 
काछीपुरा किसान समितीच्या वतीने काछीपुरा चौकात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. समितीच्या वतीने काछीपुरा चौक रंगीबेरंगी फुग्यांनी सजविण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका रूपा राय उपस्थित होत्या. काछीपुऱ्यातील शेतकरी जियालाल शाक्य, कमलेश शाक्य, गिरीश सक्सेना, दिलीप शाक्य, अशोक शाक्य, मनोज वर्मा, चांगोजी पटले यांनी काछीपुरा वस्तीतून बैलांना सजवून वाजत गाजत चौकात आणले. त्यानंतर सर्व शेतकरी बांधव बैलांना घेऊन दर्शनासाठी महादेव मंदिरात नेले. दर्शन करून आल्यानंतर मान्यवरांनी बैलांची पूजा करून शेतकऱ्यांना रुमाल आणि रोख पारितोषिक दिले. सजविलेल्या एकूण सात बैलजोड्या पोळ्यासाठी आणण्यात आल्या होत्या. पोळा पाहण्यासाठी बच्चे कंपनी, नागरिक आणि महिलांनी एकच गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पोळ्याचे क्षण टिपले. काछीपुरा किसान समितीच्या पोळ्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ब्रिटिशांनी काछीपुरा भागात भाजीचे पीक घेण्यासाठी काची समाजाच्या नागरिकांना आणले होते. त्यांना शेतीसाठी जागा दिली. तेव्हापासून काछीपुरा भागात शेती होत असून दरवर्षी पोळा उत्साहात साजरा करण्यात येतो. काछीपुरा भागात अजूनही शेतकरी आपल्या शेतीत भाजीपाल्याचे पीक घेतात. दरवर्षी उत्साहात हे शेतकरी काछीपुरा चौकात पोळा साजरा करतात. कार्यक्रमाला काछीपुरा किसान समितीचे अध्यक्ष श्रीकांत शाक्य, सदस्य आशीष वर्मा, विकास सक्सेना, कुबेर वर्मा, शुभम शाक्य, संतोष बिसेन, संजय चौरागडे, सतीश सक्सेना, ओम वर्मा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर