भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव पिंगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 20:00 IST2018-06-01T20:00:45+5:302018-06-01T20:00:45+5:30

बालपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते.

Bhartiya mazdoor sangh veteran leader Keshav Pingle passed away | भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव पिंगळे यांचे निधन

भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव पिंगळे यांचे निधन

नागपूर: भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशव पिंगळे यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सुनील,अनिल, अतुल, अभय ही चार मुले व  मुलगी लता आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. बालपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. त्यानंतर रेल्वेत नोकरीला लागल्यानंतर त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या भारतीय मजदूर संघाच्या कामाला सुरुवात केली. आणीबाणीच्या काळात त्यांना जेलमध्ये जावे लागले होते.

Web Title: Bhartiya mazdoor sangh veteran leader Keshav Pingle passed away