सत्रापूर येथे भरदुपारी चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:06+5:302021-09-12T04:13:06+5:30

कन्हान : दुकानात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने आत प्रवेश केला आणि साेन्याचे मंगळसूत्र व राेख रक्कम असा एकूण ७३ ...

Bhardupari Chari at Satrapur | सत्रापूर येथे भरदुपारी चाेरी

सत्रापूर येथे भरदुपारी चाेरी

कन्हान : दुकानात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने आत प्रवेश केला आणि साेन्याचे मंगळसूत्र व राेख रक्कम असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज चाेरून नेला. ही घटना कन्हान (ता.पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रापूर येथे गुरुवारी (दि. ९) सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली.

वैशाली वीरेंद्र मेश्राम (३०, रा.सत्रापूर, ता.पारशिवनी) यांचे सत्रापूर येथे जनरल स्टाेर्स आहे. त्या चहा पिण्याच्या निमित्ताने घरी गेल्या हाेत्या. त्यावेळी दुकानात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने आत प्रवेश केला. यात त्याने दुकानातील लाॅकरमधील ७० हजार रुपये किमतीचे साेन्याचे मंगळसूत्र आणि तीन हजार रुपये राेख असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच वैशाली मेश्रम यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३८० अन्वये गुन्हा दखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस नाईक राहुल रंगारी करीत आहेत.

Web Title: Bhardupari Chari at Satrapur