शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कार उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : अनियंत्रित झालेली भरधाव कार उलटली. त्यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले, तर अन्य ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : अनियंत्रित झालेली भरधाव कार उलटली. त्यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले, तर अन्य दाेघे किरकाेळ जखमी झाले. ही घटना काेंढाळीनजीकच्या चाकडाेह शिवारात मंगळवारी (दि.१६) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

सतीश उईके (५०), माला सतीश उईके (४५, रा. भाेपाळ, मध्यप्रदेश) व प्रवीण मसराम (४५, रा. अमरावती) अशी गंभीर जखमींची नावे असून, त्यांच्यावर नागपूर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक गणेश नारायण पुरभे (४६) व शुभम श्यामसुंदर बाेरकर (२८, रा. अमरावती) हे दाेघे किरकाेळ जखमी झाले. सदर पाचही जण एमबी-२७/झेड-४५१५ क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने अमरावतीकडून नागपूरकडे येत हाेते. दरम्यान, चाकडाेह शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित झालेली भरधाव कार रस्त्यालगत उलटली. त्यात कारमधील तिघांना गंभीररीत्या दुखापत झाली तर कारचालकासह दाेघे किरकाेळ जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी नाेंद केली असून, तपास सुरू केला आहे.