मानकापूर रिंगरोड-आॅटोमोटिव्ह चौक सिमेंट रोडचे भूमिपूजन
By Admin | Updated: June 19, 2016 02:50 IST2016-06-19T02:50:18+5:302016-06-19T02:50:18+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी केंद्र शासनाकडून मिळालेल्या २०६ कोटींच्या निधीतून मानकापूर रिंग रोड ...

मानकापूर रिंगरोड-आॅटोमोटिव्ह चौक सिमेंट रोडचे भूमिपूजन
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांनी केंद्र शासनाकडून मिळालेल्या २०६ कोटींच्या निधीतून मानकापूर रिंग रोड ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या सिमेंट रोडचे भूमिपूजन आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला भाजपा उत्तर नागपूरचे माजी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष दिलीप गौर, नगरसेविका सुषमा चौधरी, भाजपा उत्तर नागपूरचे महामंत्री संजय चौधरी, शिवनाथ पांडे, खेमराज दमाहे, लता येरखेडे, नाग विदर्भ सेंट्रल सिंधी पंचायतचे अध्यक्ष विजय केवलरामानी, विदर्भ सिंधी विकास परिषदेचे अद्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, अंशीराम मोटवानी, घनश्यामदास कुकरेजा, महेंद्र धनविजय यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून वीरेंद्र कुकरेजा यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या वेळी हा रोड तयार करण्याची घोषणा करून ती पूर्ण केली असल्याचे सांगितले. नगरसेविका सुषमा चौधरी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. मिलिंद माने यांचे आभार मानले. आमदार डॉ. मिलिंद माने यांनी केंद्र शासनाने दोन वर्षात चांगली कामे केल्यामुळे हा रस्ता तयार होत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला जगदीश वंजानी, राजेश पंचारिया, अमर मयानी, अर्जुन गंगवानी, राजेश बुटवानी, ज्योती जनबंधू, शेखर मेश्राम, महेश साधवानी, जयप्रकाश सहजरामानी, पी. टी. दारा, अशोक मेंढे, मनोज पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)