शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

भारत पेट्रोलियमच्या नागपुरातील गुरुदेवनगर पंपाची तपासणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:34 PM

भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली असता अहवाल कंपनी थेट पंपमालकाला ई-मेलवर पाठविणार आहे. त्यामुळे पंपावर ग्राहकांना पेट्रोल तंतोतंत मिळते वा नाही, याचा अहवाल गुलदस्त्यात आहे.

ठळक मुद्दे तंतोतंत मापाचा अहवाल गुलदस्त्यात : नियमित तपासणीचा अधिकाऱ्यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत पेट्रोलियमच्या नंदनवन, गुरुदेवनगर येथील पंचशील आॅटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाची कंपनीच्या दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकस्मिक तपासणी केली. ग्राहकांना पंपावरून देण्यात येणारे पेट्रोल पाच लिटरच्या मापात अधिकाऱ्यांनी तपासले. या संदर्भात चौकशी केली असता अहवाल कंपनी थेट पंपमालकाला ई-मेलवर पाठविणार आहे. त्यामुळे पंपावर ग्राहकांना पेट्रोल तंतोतंत मिळते वा नाही, याचा अहवाल गुलदस्त्यात आहे.सर्व काही आॅनलाईन झाल्याचा कंपनीचा दावा आहे. मग पंपावर मिळणारे पेट्रोल तंतोतंत आहे वा नाही, याची माहिती ग्राहकांना तातडीने मिळायला हवी, असे मत पंपावरील ग्राहकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. पंपाचे व्यवस्थापक नीलेश मोहिते यांच्या बातचित केली असता त्यांनी दर तीन महिन्याला कंपनीचे अधिकारी पंपावर येऊन माप आणि येथील सुविधांची तपासणी करीत असल्याचे सांगितले. मुश्तफा हसनजी हे पंपाचे मालक आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक देण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे अहवालाचा तपशील कळू शकला नाही. वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारीही पंपाची तपासणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.पेट्रोल डिझेलच्या दररोज वाढत्या किमतीमुळे ग्राहक आधीच त्रस्त आहेत. अशातच ग्राहकांना पंपावर पेट्रोल कमी मिळत असेल तर संताप आणखी वाढतो. पंपावर कमी पेट्रोल वा पाणीमिश्रित पेट्रोल मिळत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. अशावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नियम बाजूला ठेवून शहरातील सर्वच पंपाची वारंवार तपासणी करून ग्राहकांना पेट्रोल योग्य मापाने मिळते वा नाही, याचा अहवाल तयार करून प्रकाशित करावा. या संदर्भात पूर्वीही कंपन्यांना आकस्मिक तपासणी करण्याचे पत्र दिल्याचे अ.भा. ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे यांनी सांगितले.कंपनीच्या दक्षता विभागाचे अधिकारी पंपाची आकस्मिक तपासणी करतात. तपासणीचा अहवाल त्यांच्याकडेच असतो. तो आमच्याकडे आल्यानंतर पंपावरील मापाची स्थिती कळते. तपासणीबाबत काहीही सांगू शकत नाही, असे कंपनीचे पंपावरील अधिकारी मुशरफ अहमद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.पंपावरील मापांची नियमित तपासणीनागपुरातील भारत पेट्रोलियम, इंडियन आॅईल, हिंदुस्तान पेट्रोलियमसह खासगी पंपावरील मापाची तपासणी करण्यात येते. विभागाचे अधिकारी तपासणी करतात. पण ग्राहकांच्या तक्रारीनंंतर ही तपासणी वारंवार करण्यात येणार आहे.धनवंत कोवे, उपनियंत्रक, विदर्भ,वैधमापनशास्त्र विभाग.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपnagpurनागपूर