नो एन्ट्रीवरून भांगडियांचा राजस्थान पोलिसांशी वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 00:34 IST2021-02-21T00:32:04+5:302021-02-21T00:34:09+5:30
MLA Kirtikumar Bhangadiya कुटुंबीयांसोबत राजस्थान येथील सालासरला दर्शनासाठी जात असलेल्या आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचा सिकर शहरात नो एन्ट्रीवरून राजस्थान पोलिसांसोबत वाद झाला. या प्रकरणात पोलिसांनी शांतता भंगाची कारवाई केली आहे.

नो एन्ट्रीवरून भांगडियांचा राजस्थान पोलिसांशी वाद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुटुंबीयांसोबत राजस्थान येथील सालासरला दर्शनासाठी जात असलेल्या आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचा सिकर शहरात नो एन्ट्रीवरून राजस्थान पोलिसांसोबत वाद झाला. या प्रकरणात पोलिसांनी शांतता भंगाची कारवाई केली आहे.
याबाबत आ. भांगडिया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबीची पुष्टि केली. ते म्हणाले, आपण कुटुंबीयांसोबत दर्शनासाठी सालासरला जात आहो. यासाठी आपण दिल्ली येथून वाहन भाड्याने घेतले. प्रवासादरम्यान सिकर शहरातून जात असता वाहन चालकाने गाडी नो एन्ट्रीमध्ये नेली. ट्राफिक पोलिसांनी त्याला थांबवून कारवाई केली. मात्र त्याचे लायसन्स जप्त केल्यामुळे आपण गाडीतून खाली उतरून पोलिसाशी बोललो. लायसन्स जप्त करण्याचा आपणास अधिकार आहे काय, असा प्रश्न विचारला असता त्याने अरेरावी केली. त्यामुळे आपण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तेथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हा वाद संपला. पोलिसांनी शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई केल्याचेही भांगडिया यांनी लोकमतला सांगितले.