गुंडाकडून ‘भाई’चा ‘बर्थडे’; कारागृहासमोर चक्क फटाकेच फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2023 21:11 IST2023-04-20T21:10:59+5:302023-04-20T21:11:34+5:30

Nagpur News गुन्हेगार ‘भाई’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुंड नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर आला व चक्क फटाके फोडत अप्रत्यक्षपणे पोलिस यंत्रणेला वाकुल्याच दाखविल्या.

'Bhai''s 'Birthday' from Gunda; Crackers were burst in front of the jail | गुंडाकडून ‘भाई’चा ‘बर्थडे’; कारागृहासमोर चक्क फटाकेच फोडले

गुंडाकडून ‘भाई’चा ‘बर्थडे’; कारागृहासमोर चक्क फटाकेच फोडले

नागपूर : शहरात गुंडांवर पोलिसांचा वचकच नसल्याची बाब परत एकदा समोर आली आहे. गुन्हेगार ‘भाई’चा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुंड नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर आला व चक्क फटाके फोडत अप्रत्यक्षपणे पोलिस यंत्रणेला वाकुल्याच दाखविल्या. बुधवारी रात्री ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी गुंडाला चाकूसह अटक केली आहे.

रोशन राज मेश्राम (२०, पाचपावली) असे आरोपीचे नाव आहे. रोशन हा गुन्हेगार असून तो मकोका अंतर्गत कारागृहात होता. तो जामिनावर बाहेर आला आहे. त्याचे अनेक साथीदार कारागृहातच शिक्षा भोगत आहेत. बुधवारी रोशनचा साथीदार आशू याचा वाढदिवस होता. रोशन त्याला ‘भाई’ म्हणतो व त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रोशन मध्यरात्री १२ वाजता कारागृहासमोर पोहोचला. त्याने सोबत फटाकेदेखील आणले होते व त्याने अतिउत्साहात समोरील मार्गावर फटाके फोडले. त्यानंतर तो दुचाकीवरून पळून जाऊ लागला. काही अंतरावरच धंतोली पोलिस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी केली होती. पोलिसांनी रोशनला पकडले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू सापडला. त्याच्या दुचाकीला नंबरप्लेटदेखील नव्हती. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर शस्त्र प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 'Bhai''s 'Birthday' from Gunda; Crackers were burst in front of the jail