भाग्यश्री वासनकर जामिनासाठी हायकोर्टात
By Admin | Updated: May 4, 2017 03:37 IST2017-05-04T03:37:28+5:302017-05-04T03:37:28+5:30
शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचे सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची

भाग्यश्री वासनकर जामिनासाठी हायकोर्टात
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचे सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्रीने अमरावती येथील प्रकरणात जामीनासाठी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी बुधवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर राज्य शासनाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अमरावती येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्रीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमरावती सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
भाग्यश्रीसह अन्य आरोपींनी आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. भाग्यश्रीने वासनकर वेल्थ मॅनेजमेन्टचा पैसा स्वत:च्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे समभाग खरेदी केले होते. (प्रतिनिधी)