केळवद येथे भागवत सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:41 IST2021-02-05T04:41:30+5:302021-02-05T04:41:30+5:30

केळवद : स्थानिक माळीपुरा येथील श्री संत सावता माळी मंदिरात श्रीमद्‌भागवत कथा सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते. कपिलेश्वर मंदिरातील ...

Bhagwat week at Kelwad | केळवद येथे भागवत सप्ताह

केळवद येथे भागवत सप्ताह

केळवद : स्थानिक माळीपुरा येथील श्री संत सावता माळी मंदिरात श्रीमद्‌भागवत कथा सप्ताहाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

कपिलेश्वर मंदिरातील हरी महाराज यांच्या हस्ते व शशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत २४ जानेवारी राेजी सकाळी ११ वाजता कलश स्थापना करण्यात आली. २४ ते ३१ जानेवारीदरम्यान आयाेजित करण्यात आलेल्या या सप्ताहात राेज सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत तसेच सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत भागवत कथा वाचन करण्यात आले. ३० जानेवारीला गावात दिंडी यात्रा काढण्यात आली. ३१ जानेवारीला सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, ११ वाजता कीर्तन व दुपारी दहीहांडीचा कार्यक्रम पार पडला. शशिकांत पाटील यांनी कथा वाचन केले तर प्रवीण, लमेश, दिलीप, प्रणय, चेतन, समीर यांनी त्यांना गायन व वादनाची साथ दिली. महाप्रसाद वितरणानंतर सप्ताहाची सांगता करण्यात आली.

Web Title: Bhagwat week at Kelwad