शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या भगतसिंग यांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:00 AM

क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज या देशाचा निर्माताच आत्महत्या करीत आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील हा भारत नाही. देशात चांगले शासक येऊन क्रांतिकारकांचे स्वप्न साकारले जावे, अशी भावना शहीद भगतसिंग यांचे पुतणे अ‍ॅड. किरणजित सिंग यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभगतसिंग यांचे पुतणे किरणजित सिंग यांचे वक्तव्य : विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आज या देशाचा निर्माताच आत्महत्या करीत आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील हा भारत नाही. देशात चांगले शासक येऊन क्रांतिकारकांचे स्वप्न साकारले जावे, अशी भावना शहीद भगतसिंग यांचे पुतणे अ‍ॅड. किरणजित सिंग यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंग होते. कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.अ‍ॅड. किरणजित सिंग यांनी त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्य समरात दिलेल्या बलिदानासह भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला. ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध भगतसिंग यांनी निर्भयतेचा मंत्र दिला. देशाला मिळालेले स्वातंत्र्य ‘बिना खडक, बिना ढाल' ने नाही, तर भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाने मिळाले असल्याचे किरणजित सिंग म्हणाले. भगतसिंग यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते अध्ययनशील, तर्कशील होते. नव्या पिढीने भगतसिंग यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले की, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद व अन्य सहकाºयांच्या उल्लेखाशिवाय भारतीय स्वातंत्र्य अधुरे आहे. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनीच संपूर्ण स्वराज्याचा पाया रचला होता. स्वातंत्र्य समरातील काही सत्य दाबण्याचा प्रयत्न झाल्याची खंत व्यक्त करीत इतिहासाचे योग्य संगोपन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.शेकडो स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर क्रांतिकारकांची महतीला दुय्यम स्थान दिले गेले. त्यामुळे १५ आॅगस्ट १९४७ ला चंद्रशेखर आझाद यांच्या फौजेतील सैनिक हे स्वातंत्र्य खोटे असल्याची ओरड करीत होते, कारण त्यावेळी फाळणीने स्वातंत्र्याला कलंकित केले होते. आज भगतसिंगाचे बलिदान या देशाला माहीत असले तरी ब्रिटिशसत्तेला घाम फोडणाºया असंख्य क्रांतिकारकांचा इतिहास तरुणांना माहीत नसल्याचे मत सरदार अटलबहादूर सिंग यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी यांनी तर संचालन मनोज साल्फेकर यांनी केले. नवनीतसिंग तुली यांनी आभार मानले.

टॅग्स :Bhagat Singhभगतसिंगnagpurनागपूर