भद्रे टोळीला १२ पर्यंत पोलीस कोठडी

By Admin | Updated: February 4, 2016 02:40 IST2016-02-04T02:40:48+5:302016-02-04T02:40:48+5:30

शहर पोलिसांनी मकोका प्रकरणात कुख्यात राजू भद्रेच्या चार साथीदाराला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे.

Bhadre gang up to 12 police constables | भद्रे टोळीला १२ पर्यंत पोलीस कोठडी

भद्रे टोळीला १२ पर्यंत पोलीस कोठडी

नागपूर : शहर पोलिसांनी मकोका प्रकरणात कुख्यात राजू भद्रेच्या चार साथीदाराला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत घेतले आहे. बिल्डर अजय राऊत अपहरण प्रकरणात पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याबाबत राजू भद्रेसह नऊ आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात राजू भद्रे, दिवाकर कोत्तुलवार, त्याचा भाऊ आशिष कोत्तुलवार, नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक तेवर, भरत ऊर्फ राहुल दुबे, खुशाल ऊर्फ जल्लाद थूल आणि नितीन पाटील यांना आरोपी केले आहे. पोलिसांनी कार्तिक तेवर, राहुल दुबे, आशिष नायडू आणि नितीन वाघमारे याला अटक केली आहे. ते आतापर्यंत अपहरण आणि खंडणी वसुलीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bhadre gang up to 12 police constables