शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपूरच्या बेझनबाग सोसायटीमधील अवैध भूखंडधारकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 22:36 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दणका बसला. परंतु, सर्व याचिकाकर्ते गरजू असल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सप्टेंबरनंतरच करण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

ठळक मुद्देहायकोर्टाने दिलासा नाकारला : सप्टेंबरनंतर कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरच्या २२ अवैध भूखंडधारकांचे प्रशासनाच्या कारवाईपासून संरक्षण करण्यास नकार दिला. तसेच, अवैध भूखंडधारकांची यासंदर्भातील याचिका खारीज केली. त्यामुळे त्यांना जोरदार दणका बसला. परंतु, सर्व याचिकाकर्ते गरजू असल्याने व सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील भूखंड ताब्यात घेण्याची कारवाई सप्टेंबरनंतरच करण्यात यावी असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी हा निर्णय दिला. ६ मे २०१४ रोजी उच्च न्यायालयाने बेझनबाग सोसायटीमधील सार्वजनिक जमिनीवरचे सर्व भूखंड सहा महिन्यांत महापालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश सरकारला दिला होता. त्यानंतर आतापर्यंत केवळ ५४ भूखंडांचा ताबा मनपाला देण्यात आला. उर्वरित २२ भूखंडांवर पक्के बांधकाम असून प्रशासनाने त्या भूखंडधारकांना नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या २२ भूखंडधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरकार बेझनबाग सोसायटीला पर्यायी जमीन देणार आहे. तसेच, मूळ सार्वजनिक जमिनीवरचे अवैध भूखंड नियमित केले जाऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाची कारवाई थांबविली जावी असे त्यांचे म्हणणे होते. परंतु, सरकार बेझनबाग सोसायटीला पर्यायी जमीन देणार नसल्याचे व मूळ सार्वजनिक जमिनीवरील अवैध भूखंडही नियमित करणार नसल्याचे रेकॉर्डवर उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने अवैध भूखंडधारकांची संरक्षणाची विनंती अमान्य केली. अवैध भूखंडधारकांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी तर, सार्वजनिक जमीन मोकळी करण्याची मागणी असणाऱ्या मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.विभागीय आयुक्तांना माफी नाहीउच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे काटेकोर पालन करण्यात अपयश आल्यामुळे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी बिनशर्त माफी मागितली होती. परंतु, उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांना माफ करण्यास नकार दिला. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी प्रामाणिकपणे सहकार्य केले नाही असे परखड निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून न्यायालय अवमाननेची कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा केली व यावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी २६ जुलै रोजी व्यक्तीश: हजर होण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर