शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

सांभाळा, आज आहे मानवी भावनांचा उद्रेक करणारी खगोलीय स्थिती; लायन्स गेट पोर्टल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:56 AM

8 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी दिवशी सर्व ग्रहांची अलाइनमेंट उच्चतम सीमेवर असते, आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात एक हाय एनर्जी पोर्टल तयार होते, ज्याला स्टारगेट पोर्टल असेही म्हणतात.

नागपूर: दर वर्षी, २६ जुलै ते १२ ऑगस्ट या काळात एक विशिष्ट योग घडून येतो. आपल्या आकाशगंगेमध्ये 'Sirius'  या नावाचा एक ग्रह आहे ज्याला 'सेंट्रल सन' किंवा 'स्पिरिच्युअल सन' असेही म्हणतात. हा ग्रह सूर्या पेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे आणि तो सूर्यावर त्याच्या कॉस्मिक ऊजेर्ने खूप मोठा प्रभाव टाकतो. परिणामी पृथ्वी वरही त्याचा मोठा परिणाम दिसतो.दर वर्षी 26 जुलै या दिवशी सूर्य लिओ कॉन्स्टेलेशन म्हणजेच लिओ नक्षत्र मालेत प्रवेश करतो. आणि त्यामुळे अंतराळात 'Sirius'  हा ग्रह, सूर्य, आणि पृथ्वी यांच्यामध्ये एक विशिष्ठ खगोलशास्त्रीय योग निर्माण होतो. आणि हे सर्व एका सरळ रेषेत येतात.या योगामुळे आपण बघितले असेल की, दरवर्षी 26 जुलै हा दिवस काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. कारण या योगामुळे पृथ्वीवर येणाऱ्या हाय फ्रिक्वेन्सी उर्जालहरी मानवी जाणिवेच्या सर्व पातळ्यांवर अपग्रेडस घेऊन येतात. जे काही लो व्हायब्रेशन वर आहे, ते निघून जाण्यासाठी बाहेर पडते. याचा परिणाम म्हणून मानवी भावनांचा उद्रेक - दंगल, घातपात, तसेच नैसर्गिक आपत्ती - पूर भूकंप, वादळ अशा सारख्या घटना जगभरात अनुभवास येतात.या ग्रहयोगातील विशिष्ट अलाइनमेंट मुळे पृथ्वीवरील जो भाग सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्हेट होतो तो म्हणजे इजिप्त येथील गिझा पिरॅमिड हा होय. हे या ग्रहयोगातील सर्वात जास्त ऊर्जा ग्रहण करणारे स्थान बनते.. आणि या ऊजेर्मुळे ते अ‍ॅक्टिव्हेट होते. गिझा पिरॅमिड हे पृथ्वीचे विशुद्धी चक्र म्हणून ओळखले जाते...सध्याच्या ऊर्जा स्थित्यंतराच्या काळात जेव्हा वैश्विक ऊर्जा कित्येक पटीने वाढलेली असते, तेव्हा कार्मिक क्लिअरिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणजेच जे कर्म तुम्ही कराल त्याचे फळ तात्काळ प्राप्त होते. जर वाईट कर्म केले असेल तर त्याचे वाईट कर्मभोग तात्काळ आपल्या नशिबी येतात.परंतु दुसरीकडे, या सर्व घटनांना येणाऱ्या काळातील चांगल्या बदलांची नांदी या अर्थानेच घ्यायचे असते, कारण हे एक प्रकारचे एनर्जी क्लिअरिंग असते. आणि हे होऊन गेल्यानंतर मानवी जाणिवेच्या अवकाशात एक नवी सुरुवात होत असते. आपला कॉन्शसनेस वाढण्यासाठी हे बदल घडणे आवश्यक असते. कारण या सर्व बदलांच्या काळानंतर मानवी जाणीवेवर - व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सर्व जुनाट कल्पना, बीलीफ सिस्टिम्स जाऊन नवीन विचारधारा, नवीन सुरुवात, नवीन दृष्टिकोन मिळण्यास मदत होते.8 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी दिवशी वर उल्लेखलेल्या सर्व ग्रहांची अलाइनमेंट उच्चतम सीमेवर असते, आणि त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात एक हाय एनर्जी पोर्टल तयार होते, ज्याला स्टारगेट पोर्टल असेही म्हणतात. लियो नक्षत्राला लायन असेही म्हणतात त्यामुळे 8 ऑगस्ट हा दिवस लायन्स गेट पोर्टल म्हणून ओळखला जातो. याला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये "सिंहस्थ" असे म्हणतात आणि उच्चतम वैश्विक ऊर्जा प्रवाहाचा लाभ घेण्यासाठी या कालावधीमध्ये पवित्र नद्यांच्या किनारी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.भौतिक आणि अध्यात्मिक या दोन जगांमधली सीमारेषा आजच्या दिवशी धूसर झालेली असते आणि म्हणून मानवी जाणीवेवर सर्व पातळ्यांवर अपग्रेडस् अनुभवास येतात. हा योग साधारण 12ऑगस्टपर्यंत राहतो. हा पूर्ण काळ आपल्या अनाहत (हार्ट) चक्राच्या ऍक्टिव्हेशन चा सुद्धा काळ आहे.जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अशी हाय एनर्जी पोर्टल ओपन होतात, त्यावेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही शक्ती ऊर्जा पातळीवर अत्यंत कार्यरत झालेल्या असतात..जर काही नकारात्मक भावनांचा उद्रेक व्यक्तिगत अथवा सामाजिक पातळीवर अनुभवास येत असेल तर त्याला अत्यंत शांतपणे हाताळावे. आपण सामाजिक पातळीवर काही काम करत असू, तर आपल्यामुळे कोणी ट्रिगर होऊ नये याची काळजी घ्यावी.. सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषयांवर लोकांना ट्रिगर करून खूप मोठे एनर्जी हार्वेस्टिंग होत आहे. जर तुम्ही संयम राखला नाही तर तुम्हीही या एनर्जी हार्वेस्टिंगचे बळी ठरून आपली बहुमूल्य ऊर्जा वाया घालवत आहात.हे जे ऊर्जा स्थित्यंतर चालू आहे, याच्या परिणामस्वरूप खूप जणांना वेगवेगळी शारीरिक आणि भावनिक लक्षणेही जाणवत आहेत.झोपेच्या पॅटर्न मध्ये झालेला बदल, झोप न येणे, किंवा जास्त झोप येणे, शारीरिक आणि मानसिक थकवा, अधून मधून होणारी डोकेदुखी, भावनिक चढ-उतार, उदासी, एकटेपणा, भीती, काळजी, डिप्रेशन, विस्मृती, अस्वस्थता इत्यादी लक्षणे सध्या अनुभवण्यास येत आहेत.या ऊर्जा स्थित्यंतरामधे स्वत: मध्ये होणाऱ्या शारीरिक आणि भावनिक क्लीअरिंगला अत्यंत softly हाताळावे. जर आपल्या शरीराला जास्त विश्रांतीची गरज वाटली तर ती नक्की घ्यावी. पाणी भरपूर प्यावे. सॉल्ट बाथ घ्यावा. नकारात्मक भावना आपल्यातून निघून जाण्यासाठी आणि त्यांचे हीलिंग होण्यासाठी बाहेर पडत असतात.लायन्स गेट पोर्टल हे आपल्या अध्यात्मिक विकासाचे द्वार आहे असे समजून या स्थित्यंतराचे स्वागत केले तर आपल्यातील शारीरिक आणि भावनिक क्लिअरिंग ला आपण जास्त चांगल्या प्रकारे हाताळू शकतो, आणि लायन्स गेट पोर्टलच्या या उच्चतम वैश्विक ऊजेर्चा लाभ करून घेऊ शकतो.(वैशाली देशपांडे यांच्या ऊर्जा या फेसबुकपेजवरून साभार.)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष