सावधान, विदर्भात वाघांची शिकार वाढली; विषप्रयोगाचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 07:45 AM2021-09-28T07:45:00+5:302021-09-28T07:45:02+5:30

Nagpur News २०१८ सालापासून राज्यात २४ वाघांची शिकार करण्यात आली. यातील बहुतांश प्रकरणे ही विदर्भातीलच असून, नागपूर विभागात शिकाऱ्यांची दहशत आहे.

Beware, tiger hunting has increased in Vidarbha; Use of poisoning | सावधान, विदर्भात वाघांची शिकार वाढली; विषप्रयोगाचा वापर

सावधान, विदर्भात वाघांची शिकार वाढली; विषप्रयोगाचा वापर

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात ४५ महिन्यांत २४ वाघांची शिकार

नागपूर : जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून झालेले राजकारण शांत झाले; परंतु वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आलेले नाही. २०१८ सालापासून राज्यात २४ वाघांची शिकार करण्यात आली. यातील बहुतांश प्रकरणे ही विदर्भातीलच असून, नागपूर विभागात शिकाऱ्यांची दहशत आहे. त्यातही ४६ टक्के शिकारीत वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले. २०१८च्या तुलनेत २०२१ मध्ये वाघांच्या शिकारीचा आकडा वाढला असून, शिकाऱ्यांसमोर वनविभाग हतबल आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. (Beware, tiger hunting has increased in Vidarbha)

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे विचारणा केली होती. राज्यात किती वाघांचा मृत्यू झाला, यातील शिकारीची प्रकरणे किती होती, आरोपींविरोधात काय कारवाई झाली, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्रातील २४ वाघांची शिकार करण्यात आली. २०१८ मध्ये ३, २०१९ मध्ये ६, २०२० मध्ये ८ तर २०२१ मध्ये सात वाघांची शिकार झाली. सर्वाधिक १४ वाघ (५८ टक्के) नागपूर सर्कलमध्ये मारण्यात आले. १४ वाघांना विषप्रयोग करून ठार मारण्यात आले, तर विजेचा प्रवाह सोडून चार वाघांची शिकार झाली.

५७ बिबट्यांचा मृत्यू; ४५ ची शिकार

जानेवारी २०१८ पासून ४५ महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५७ बिबट्यांचा मृत्यू झाला. यापैकी ७९ टक्के बिबट्यांचा मृत्यू शिकारीतून झाला, तर १२ बिबट्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सर्वाधिक १४ बिबट्यांचा कोल्हापूर सर्कलला मृत्यू झाला तर नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, अमरावती सर्कलमध्ये प्रत्येकी सहा बिबट शिकार किंवा शॉकमुळे मरण पावले.

 

Web Title: Beware, tiger hunting has increased in Vidarbha; Use of poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ