शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सावधान, नागपूरचीही हवा हाेतेय वाईट; चारही स्टेशनवर निर्देशांक २२० च्यावर

By निशांत वानखेडे | Updated: November 21, 2024 18:55 IST

Nagpur : थंडी वाढताच वाढले प्रदूषण

निशांत वानखेडे

नागपूर : देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रचंड वाढलेल्या प्रदूषणामुळे तेथील जनजीवन विस्कटले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास समस्या हाेत असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये प्रदूषण दिल्लीएवढे नसले तरी थंडी वाढताच हवा खराब हाेत चालली आहे. शहरातील चारही स्टेशनवर वायु गुणवत्ता निर्देशांक (एक्युआय) २२० च्यावर पाेहचला आहे, जाे वाईट हवेचा मानक आहे.

तज्ज्ञांच्या मते दरवर्षी थंडी वाढली की प्रदूषणातही वाढ हाेते. हिवाळ्याच्या बहुतेक महिन्यात हवेची गुणवत्ता खराब असते. तीच स्थिती यावर्षीही दिसून येत आहे. साधारणत: १५ नाेव्हेंबरपासून पारा घसरून थंडीत वाढ हाेत आहे, तसे प्रदूषणही वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) च्या वेबसाईटवरील चालू आकडेवारीनुसार नागपूरच्या चारही स्टेशनवर एक्युआय २०० च्यावर गेला आहे.

भारतीय मानकानुसार वायू निर्देशांक ० ते ५० पर्यंत चांगला, ५१ ते १०० पर्यंत समाधानकारक व १०१ ते २०० पर्यंत मध्यम गुणवत्तेचा असताे. २०१ ते ३०० पर्यंत वाईट, ३०१ ते ४०० खुप खराब व ४०० च्यावर अतिशय धाेकादायक असताे. सीपीसीबीच्या १६ ते २१ नाेव्हेंबरच्या नाेंदीनुसार केवळ १९ नाेव्हेंबर राेजी एक्युआय २०० च्या आतमध्ये हाेता. इतर दिवशी ताे २१० ते २५५ पर्यंत म्हणजे वाईट स्थितीत गेल्याची नाेंद आहे.

कशी हाेती स्थिती?

  • सीपीसीबीच्या अंबाझरी, जीपीओ, रामनगर व महाल या चार स्टेशनवर दर तासाला नाेंदी घेतल्या जातात.
  • या नाेंदीनुसार २० व २१ नाेव्हेंबरला हवेची गुणवत्ता सातत्याने २२० च्यावर नाेंदविण्यात आली आहे.
  • महाल आणि रामनगर येथे २० नाेव्हेंबरला एक्युआय ३५५ पर्यंत म्हणजे अतिशय वाईट अवस्थेत गेल्याचीही नाेंद आहे.
  • दाेन्ही स्टेशनवर पहाटेचा वेळ साेडला तर प्रत्येक तासाला एक्युआय २१० ते २५५ च्यादरम्यान राहिला आहे.
  • सिव्हील लाईन्ससारख्या भागातील जीपीओ स्टेशनवर २१ राेजी दुपारी १२ वाजतापासून २२४ वर गेलेले एक्युआय सायंकाळी ६ वाजतापर्यंत २४० वर गेल्याची नाेंद आहे.

 

धुलीकण प्रदूषणास कारणीभूत

नागपूरच्या प्रदूषणात पार्टीकुलेट मॅटर (धुलीकण) हाच सर्वात माेठा घटक आहे. पीएम-२.५ व पीएम-१० या प्रदूषकाच्या वाढीमुळे संत्रानगरीत प्रदूषणाचा स्तर वाढला आहे. शहरात सध्या माेठ्या प्रमाणात बांधकाम हाेत आहे. त्यामुळे धुलीकणांचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

थंडीतच का वाढते प्रदूषण?उन्हाळ्यात सर्वाधिक प्रदूषण हाेत असले तरी हे घटक वातावरणात उडून जातात. हिवाळ्यात त्याच्या विपरित असते. वातावरणात असलेल्या दवबिंदूला चिकटून प्रदूषित धुलीकण जमिनीच्या आसपासच पसरलेले असतात. त्यामुळे प्रदूषणाचा स्तर वाढलेला असताे.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर