शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सावधान, फटाक्यांमुळे अंधत्वाचा धोका अधिक

By सुमेध वाघमार | Updated: November 10, 2023 18:33 IST

डोळ्यांच्या दुखापतींमध्ये १६ वषार्खालील मुलांचा वाटा ४९ टक्क्यांवर

नागपूर :  दिवाळी म्हणजे अमावस्येच्या काळोखाला भेदणारा प्रकाशाचा सण. रोशणाईचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. पण कधी कधी अति उत्साहाता सुरक्षेकडे जरा दुर्लक्ष होते. विशेषत: फटाक्यांमुळे अंधत्वाची जोखीम निर्माण होते. देशात दरवर्षी सुमारे पाच हजारावर लोकांची दृष्टी जाते. अनार, सुतळी बॉम्ब, चक्री आणि रॉकेट या फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

फटाक्यांमुळे होणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण जागतिक पातळीवर पाच लाखांवर आहे. फटाक्यात चारकोल, गंधक, नायट्रेट, क्लोरेट, परफ्लोरेट आदी घटक असतात. या घटकाचा निर्जीव आणि जीवित दोघांवरही दुष्परिणाम होतो. फटाका फुटल्यानंतर निघणारा धूर डोळ्यांना व फुफ्फुसांना तसेच त्वचेला अपायकारक असतो. दमा व अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढते. फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण व सामाजिक प्रदूषण होते. फटाके फोडलेल्या ठिकाणाचे तापमान ४०० ते ५०० डीग्री पर्यंत वाढते. यामुळे फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा होणाºयांची संख्या सर्वाधिक असते.

-फटाक्यांच्या धोक्यापासून १६ वर्षाखालील मुलांना जपा

बंगरुळू येथील शासकीय मिंटो आॅप्थल्मोलॉजी हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नोंदीनुसार, २००८ ते २०२० या कालावधीत फटाक्यांमुळे डोळ्यांना झालेल्या दुखापतींवरील आणि रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती सादर केली आहे. यात फटाक्यांमुळे झालेल्या डोळ्यांच्या दुखापतींपैकी १६ वषार्खालील मुलांचा वाटा ४९.३ टक्के आहे. यामुळे फटाक्यांपासून १६वर्षाखालील मुलांना जपा असे आवाहन नेत्ररोग तज्ज्ञानी केले आहे. 

- बघणाऱ्यांना जास्त इजा

सारक्षी नेत्रालयाच्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. रिंकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ फटाके फोडणाºयांपेक्षा बघणाºयांना याची जास्त इजा होते. कारण, स्फोटामुळे दगड, माती वेगाने उडते व डोळ्याला व इतर अवयवांना इजा होऊ शकते. फटाक्यात जळती ठिणगी किंवा घटक गेल्यास डोळा कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. दृष्टिहीनता, अंधत्व व गंभीर दुखापतींमुळे डोळा गमवाव लागू शकतो. बारुदमुळे डोळ्यांना रासायनिक इजा होऊ शकते. 

- जखम झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या

फटाक्यामुळे डोळ्याला इजा झाल्यास तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. डॉक्टरांपर्यंत पोहचतपर्यंत डोळे चोळू नका. यामुळे डोळ्यातील द्रव्य बाहेर येऊ शकते किंवा डोळ्यात फसलेले कण आत खोलवर जाऊ शकतात. डोळा खराब होण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत. शक्य तितक्या लवकर जवळच्या नेत्ररोग तज्ज्ञांना दाखवून उपचार करावा.

- डॉ. रिंकल फुसाटे, नेत्ररोग तज्ज्ञ 

- या लक्षणांकडे दुर्लक्ष नको 

१)  फटाक्यांमुळे डोळा लाल होणे२) पाणी जाणे३)  डोळा दुखणे४) अचानक डोळ्याची नजर कमी होणे५) उजेड सहन न होणे६) डोके दुखणे७) डोळ्यात चिपड येणे८)  डोळे सुजणे, उलटी होणे

टॅग्स :Healthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगाfire crackerफटाकेnagpurनागपूर