शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोसमी वाऱ्यांनी दिला दगा, राज्यात कुठे कमी, तर कुठे जास्त पाऊस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 07:09 IST

जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे

गोपालकृष्ण मांडवकर 

नागपूर : पावसाच्या असमतोलाने यंदा गणित बिघडवले आहे. सप्टेंबर उजाडला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने सरासरीही गाठलेली नाही. अनेक मध्यम आणि छोट्या धरणांचे काठ रिकामे आहेत. लघु प्रकल्पांत तर जेमतेम १८ टक्केच पाणी आहे. 

जुलै ते ऑगस्टदरम्यान १०० टक्के पावसाचा अंदाज होता. पण मोसमी वाऱ्यांनी दगा दिला आणि पर्जन्यमानावर परिणाम झाला. परतीचा पाऊस चांगला पडण्याची अपेक्षा असली तरी येत्या वर्षात पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल की काय अशी एकंदर स्थिती आहे. राज्यात आतापर्यंत कोकणात १२ टक्के, मध्य महाराष्ट्रात ९ टक्के, मराठवाड्यात १९ टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद आहे. विदर्भात मात्र १४ टक्के पाऊस कमी आहे.

सरासरीपेक्षा अधिक पाऊसवाशिम, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई उपनगर, चंद्रपूर, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली.सरासरीपेक्षा कमी पाऊसबुलडाणा, अकोला, अमरावती, ठाणे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदूरबार, पुणे, मुंबई शहर.सरासरीइतका पाऊस : रायगड, पालघर.

असमतोल पावसाची कारणे काय?

n यंदा मान्सून विलंबाने आला.n मोसमी वाऱ्यांची दिशा वारंवार बदलत राहिली.n बंगालच्या खाडीत अपेक्षित दबाव निर्माण झाला नाही.n इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने कमी पाऊस.n समुद्राकडून येणारे मोसमी वारे यंदा अनुकूल नाहीत.

या महिन्यात चांगला पाऊसयंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. बंगालच्या खाडीत महिन्यात किमान ४ वेळा निर्माण होणारा दबाव २ वेळा तयार झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड अद्याप निगेटिव्हच आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील.     - दामोदर पायी, प्रमुख,     क्लायमेट रिसर्च अँड सर्विसेस, आयएमडी, पुणे

जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वनिकरण, प्रदुषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले.     - सुरेश चोपणे,     पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र