शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नागपुरात २० कोटींची सुपारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:54 AM

इंडोनिशियातून अवैधपणे सुपारीची तस्करी करणाऱ्या नागपुरातील मनोज कोठारी नामक व्यापाऱ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करीत जवळपास २० कोटी रुपयांचे १० सुपारीचे ट्रक ताब्यात घेतले.

ठळक मुद्देडीआरआयची कारवाई व्यापाऱ्यांची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंडोनिशियातून अवैधपणे सुपारीची तस्करी करणाऱ्या नागपुरातील मनोज कोठारी नामक व्यापाऱ्यावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) कारवाई करीत जवळपास २० कोटी रुपयांचे १० सुपारीचे ट्रक ताब्यात घेतले. सर्व ट्रक नागपुरातून रायपूरला जात होते. अधिकाऱ्यांनी रस्त्यातच ट्रक जप्त केले. या तस्करीतून १० कोटींचा सीमा शुल्क बुडविण्याचा अंदाज आहे.

हलक्या दर्जाच्या सुपारीची आयातनागपूर देशातील सुपारीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इंडोनिशियातून सुपारीच्या आयातीवर १०८ टक्के सीमाशुल्क लागतो. पण सीमाशुल्क न भरता नागपुरात आणलेल्या सुपारीच्या विक्रीतून व्यापारी बक्कळ नफा कमवितात. त्यामुळे नागपुरातील अनेक व्यापारी सुपारीच्या तस्करीत गुंतले आहेत. जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने इंडोनिशिया आणि म्यानमार या देशातून अत्यंत कमी भावात सुपारी खरेदी करून समुद्रीमागे भारतात आणि नागपुरात आणतात. व्यापाऱ्यांना अत्यंत हलक्या दर्जाची सुपारी नागपुरात आणण्यासाठी प्रति किलो ५० ते ८० रुपयांपर्यंत खर्च येतो. सीमाशुल्काची चोरी करून नागपुरात २०० ते २५० रुपये भावाने विक्री करण्यात येते. पूर्वीही डीआरआयने नागपुरातील इतवारी भागातील ट्रान्सपोर्टर आणि व्यापाºयांवर कारवाई करून सुपारी तस्करीचे १० ट्रक जप्त केले होते. ही कारवाई बुटीबोरी, काटोल, कळमेश्वर टोल नाक्यावर करण्यात आली होती. मंगळवारच्या धाडीत सुपारीचा साठा जास्त असल्यामुळे कारवाई दोन दिवस सुरू राहणार आहे. कारवाईनंतर मनोज कोठारी या व्यापाऱ्यांसह अनेकांना ताब्यात घेतले आहे.

दरदिवशी कोट्यवधींचा व्यवसायनागपूर हे सुपारी तस्करीचे केंद्र झाले आहे. दरदिवशी अनेक ट्रक सुपारी विक्रीसाठी येते. सुपारी तस्करीतून दरदिवशी कोट्यवधींचा व्यवसाय होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपुरातून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाच्या अनेक भागात सुपारीची विक्री करण्यात येते.बुटीबोरीत अडीच कोटींचा गांजा जप्तकाही दिवसांपूर्वी डीआरआयने बुटीबोरी परिसरात कारवाई करून गांजाची तस्करी करणाऱ्यांकडून अडीच कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता. कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली होती. ओडिशा राज्यातून एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती डीआरआयला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुटीबोरी परिसरातील बोरखेडी टोल नाक्याजवळ ट्रकच्या खालीत भागात तयार केलेल्या कप्प्यातून सुमारे अडीच कोटी रुपयांचा दीड टन गांजा जप्त केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी