कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:50+5:302021-02-05T04:56:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात साधारणपणे एक १ लाख ३० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मे ते ऑगस्ट ...

कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात साधारणपणे एक १ लाख ३० हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मे ते ऑगस्ट या काळात परिस्थिती भीषण होती. मात्र न डगमगता कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेने उत्तम कामगिरी केल्याची पावती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. प्रशासनाला नागपूरकर जनतेनेही उत्तम साथ दिली. प्रारंभीच्या हतबलतेपासून ते आताच्या लसीकरणापर्यंतचा हा कोविड लढा जनता, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या सामूहिक दृढतेचा विजय असल्याचे मत पालकमंत्री राऊत यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचा मुख्य कायर्क्रम कस्तुरचंद पार्कवर पार पडला. पालकमंत्री राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण बी., एनएमआरडी आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह माजी आमदार यादवराव देवगडे, माजी खासदार गेव्ह आवारी व माजी आमदार एस. क्यू. जामा प्रामुख्याने उपस्थित होते.
बॉक्स
कोरोना योद्धा व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
प्रजासत्ताकदिनी अंबाझरी पोलीस ठाण्याचे शारदाप्रसाद रमाकांत मिश्रा यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक तसेच काटोल येथील वीरमाता मीरा रमेशराव सतई आणि हिंगणा येथील वीरपत्नी प्रमिला नरेश बडोले यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले.
यासोबतच कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी (अतिरिक्त) डॉ. असिम इनामदार, प्रवीण पडवे, मंजुषा रूपसिंग जाधव, सागर नंदकिशोर श्रीवास, डॉ. सुनील महाकाळकर, डॉ. धीरज सगरुळे, डॉ. डी. पी. सेनगुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, इंदिरा चौधरी, सूर्यकांत पाटील, डागा डॉ. सीमा पारवेकर सवई, डॉ. सुलभा मूल, डॉ. माधुरी थोरात, डॉ. रश्मी भैसारे, वासुदेव आकरे यांना सन्मानित करण्यात आले. नागपूर सुरेंद्रगड महापालिका हिंदी शाळेच्या स्वाती विनोद मिश्रा आणि काजल रामनरेश शर्मा या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. विज्ञान शिक्षिका दीप्ती बिष्ट यांना देखील सन्मानित करण्यात आले.