अर्ज एक फायदे अनेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:08 IST2020-12-26T04:08:39+5:302020-12-26T04:08:39+5:30

जलालखेडा : कृषी विभागाने सुरू केलेल्या महाडीबीटी पोर्टल योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक अर्ज करून शेकडो योजनांचा फायदा घेता येणार आहे. ...

The benefits of an application are many | अर्ज एक फायदे अनेक

अर्ज एक फायदे अनेक

जलालखेडा : कृषी विभागाने सुरू केलेल्या महाडीबीटी पोर्टल योजनेंतर्गत शेतकऱ्यांना एक अर्ज करून शेकडो योजनांचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी पडणारी योजना शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगळा फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती निगडित विविध बाबीकरिता अर्ज करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या पर्यायाची निवड करायची आहे. शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र , सेतू केंद्र, ग्राम पंचायत मधील संग्राम केंद्र या माध्यमातून अर्ज करू शकतात. नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना आधार क्रमांक संबंधित संकेत स्थळावर जाऊन प्रमाणित करावा लागेल. ज्या शेतकऱ्याकडे आधारकार्ड नसेल त्यांनी आधार केंद्रावर जाऊन नोंदणी करून नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलवर नमूद करून अर्ज भरता येईल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कृषी विषयक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केला नसेल त्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज पोर्टलवर भरावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: The benefits of an application are many