व्यापाऱ्यांवरील खटले मागे
By Admin | Updated: July 26, 2015 03:09 IST2015-07-26T03:09:13+5:302015-07-26T03:09:13+5:30
एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान

व्यापाऱ्यांवरील खटले मागे
एलबीटी आंदोलन : सरकारचे आदेश
नागपूर : एलबीटी रद्द करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या नेतृत्वात पुकारलेल्या आंदोलनादरम्यान १०६ व्यापाऱ्यांवर नोंदविण्यात आलेले गुन्हे सरकारने शनिवारी मागे घेतले आहेत. विदर्भातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तब्बल ४० दिवसांचे बंद आंदोलन केले होते, हे विशेष. आंदोलनादरम्यान नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी १०६ व्यापाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद होती. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्याची मागणी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) मुख्यमंत्र्यांकडे रेटून नेली होती. त्यानुसार सरकारने २५ जुलैला सर्व खटले परत घेण्याचे आदेश जारी केले आहेत. आंदोलनादरम्यान तहसील, अंबाझरी, सक्करदरा, कोतवाली, लकडगंज, धंतोली, कळमना आदी पोलीस ठाण्यांत पोलिसांनी व्यापाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. व्यापाऱ्यांवरील खटले मागे घेण्यासाठी कोर्टाला शिफारस पत्र देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सला पत्राद्वारे दिली आहे, असे एनव्हीसीसीचे मानद सचिव जयप्रकाश पारेख यांनी म्हटले आहे.(प्रतिनिधी)