शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन : आशिष शेलार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:05 IST

भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.

ठळक मुद्देभाजपा प्रभाग ३२ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. त्यामुळे संघटनेचा विस्तार करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. भाजपचे सदस्य होणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देश मजबूत करण्याच्या कार्याला समर्थन देणे होय. देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासह सीमेपलिकडेही देशाचे वर्चस्व कायम करण्याला समर्थन देणे होय. भाजपचे सदस्य होणे म्हणजे देशभक्तीला समर्थन देणे होय, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केले.भाजपच्या प्रभाग ३२ तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवारी स्मृती भवन, शारदा चौक येथे करण्यात आला. यावेळी शेलार बोलत होते. याप्रसंगी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार मोहन मते, नगरसेविका रूपाली ठाकूर, पुष्पा राऊत, दीपक चौधरी, अभय गोटेकर, संजू ठाकूर, परशु ठाकूर, बबनराव भुयारकर आदी मंचावर उपस्थित होते. यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासाची गती हजार पटीने वाढविली आहे. त्यांनी आता जलसिंचनाच्या कामातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा पण घेतला असून ते यात निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सत्कार हा आईवडिलांनी घेतलेल्या परिश्रमाचे ऋण व्यक्त करणारा असतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबत संस्कृतीचे व संस्काराचे जतन केल्यास जगाच्या स्पर्धेत आपला देश पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपच्या सदस्यता नोंदणीचा क्रमांक जाहीर करीत सदस्यता घेणाऱ्या दोन सदस्यांचा सत्कार केला. कार्यकर्त्यांनी वस्त्या, गल्ली व चाळीत जाऊन अधिकाधिक सदस्य बनवावे, असे आवाहन केले. कार्यक्रमात दहावी, बारावीच्या २५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाStudentविद्यार्थी