स्वयंरोजगारातून स्वयंपूर्ण व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:29+5:302021-02-09T04:10:29+5:30

कामठी : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार उभारावा. स्वयंरोजगारातून महिला आत्मनिर्भर होतील. ...

Become self-sufficient through self-employment | स्वयंरोजगारातून स्वयंपूर्ण व्हा

स्वयंरोजगारातून स्वयंपूर्ण व्हा

कामठी : ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार उभारावा. स्वयंरोजगारातून महिला आत्मनिर्भर होतील. त्यांच्या कुटुंबाचा आणि पर्यायाने गावाचा विकास होईल, असे प्रतिपादन कढोली ग्रा.पं.च्या सरपंच प्रांजल वाघ यांनी केले.

कढोली ग्रा.पं.च्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात वाघ यांनी गावातील महिलांशी संवाद साधला. यावेळी डॉ. एस. सारडा, सारिका सहारे, दुर्गा वाघ, दुर्गा कडू, दुर्गा शहाणे, आरती घुले, मीनाक्षी वाघ, शारदा मोरे, कविता घुले उपस्थित होत्या. कार्यक्रमात सरपंच वाघ व डॉ. एस. सारडा यांच्या हस्ते विधवा महिलांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. मान्यवरांनी याविषयी महिलांना स्वयंरोजगारातून करावयाच्या विविध उपक्रमाची माहिती देण्यात आली. संचालन सारिका सहारे यांनी तर आभार दुर्गा शहाणे यांनी मानले.

Web Title: Become self-sufficient through self-employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.