आगीत दाेन घरे बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:23+5:302021-04-30T04:10:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : घरावरून गेलेल्या विद्युत तारेवर शाॅर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडून दाेन घरांना आग लागली. त्यात दाेन्ही ...

आगीत दाेन घरे बेचिराख
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : घरावरून गेलेल्या विद्युत तारेवर शाॅर्टसर्किट झाल्याने ठिणगी पडून दाेन घरांना आग लागली. त्यात दाेन्ही घरे जळून खाक झाली. परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवीत महिला व मुलांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. ही घटना कुही येथे बुधवारी (दि.२८) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
कुही शहराबाहेरील परिसरात भाेलाराम मनहारे व राजू बंजारे यांची घरे आजूबाजूला असून, दाेघेही राेजमजुरी करतात. दाेन्ही कुटुंबातील पुरुष मंडळी मजुरीच्या कामावर गेले हाेते. स्त्रिया व मुले घरी हाेती. दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरावरून गेलेल्या विद्युत तारेवर शाॅर्टसर्किट झाल्याने ठिगणी पडून गवत व कवेलूचे छत असलेल्या घरांनी पेट घेतला. काही क्षणातच आगीचा भडका उडाला. धूर दिसून येताच परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान साधत दाेन्ही घरातील स्त्रिया व मुलांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. मात्र आगीमुळे दाेन्ही घरातील जीवनाेपयाेगी वस्तू, घरगुती साहित्य, अन्नधान्य व राेख रक्कम जळून खाक झाली. आगीची तीव्रता पाहता उमरेड नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
या आगीच्या घटनेमुळे दाेन्ही कुटुंबांचे अंदाजे ५३,५०० हजार रुपयाचे नुकसान झाले असून, दाेन्ही कुटुंब उघड्यावर आले आहे. आगीच्या घटनेची मिळताच तहसील, नगर पंचायत व कुही पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.