नागपुरात ब्युटी पार्लरच्या आड कुंटणखाना : महिलेसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:14 IST2019-01-05T23:12:48+5:302019-01-05T23:14:03+5:30
अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

नागपुरात ब्युटी पार्लरच्या आड कुंटणखाना : महिलेसह दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीतील गायकवाडनगरात ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पकडले.काजल जुगल कैथेले (वय २२, रा. चंदननगर) आणि अमोल गुणवंत मदामे (वय ४५, रा. स्वावलंबीनगर) अशी कुंटणखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
काजलने गायकवाडनगरात काही महिन्यांपूर्वी ग्लोरी ब्युटी पार्लर सुरू केले. येथे प्रारंभी महिला-मुलींना सौंदर्याचे धडे देणाऱ्या काजलने नंतर त्यांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणे सुरू केले. यासाठी तिचा साथीदार अमोल तिला मदत करीत होता. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला-मुलींची काजलच्या ब्युटी पार्लरमध्ये गर्दी वाढल्यानंतर ती येथेच ग्राहकांना बोलावून त्यांना वारांगना उपलब्ध करून देऊ लागली. त्यांच्याकडून ती बक्कळ रक्कम घेत होती. ही माहिती अजनीचे ठाणेदार एच. एल. उरलागोंडावार यांनी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी तेथे कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी काजल, अमोलकडे एक ग्राहक पाठविण्यात आला. त्याने वारांगनेची मागणी करताच काजल आणि अमोलने त्याच्याकडून रक्कम स्वीकारून त्याला देहविक्रय करणारी एक वारांगना उपलब्ध करून दिली. त्यानंतर काही वेळेतच पोलिसांनी तेथे छापा घातला. पोलिसांनी आरोपी काजल तसेच अमोलला अटक केली. वृत्त लिहिस्तोवर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.