जुन्या वादातून तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:13 IST2021-09-08T04:13:26+5:302021-09-08T04:13:26+5:30

खापरखेडा : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्या पायावर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात ताे तरुण ...

Beating a young man out of an old argument | जुन्या वादातून तरुणास मारहाण

जुन्या वादातून तरुणास मारहाण

खापरखेडा : जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्या पायावर शस्त्राने वार करण्यात आले. त्यात ताे तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना खापरखेडा (ता.सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभूळखेडा येथे साेमवारी (दि. ६) सकेाळी १०.४५ वाजताच्या सुमारास घडली.

अमाेल वसंतराव झाेड (२६) असे जखमीचे तर हर्षल सुनील पाटील (२३) असे आराेपीचे नाव आहे. दाेघेही बाभूळखेडा, ता.कामठी येथील रहिवासी असून, काही दिवसांपूर्वी या दाेघांमध्ये भांडण झाले हाेते. या भांडणाचा बदला घेण्यासाठी हर्षलने अमाेलसाेबत साेमवारी वाद उकरून काढला. त्याने अमाेलला शिवीगाळ व मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, हर्षलने त्याला पुन्हा मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अमाेलचा भाऊ मिथुन वसंतराव झाेड याच्या तक्रारीवरून हर्षलविरुद्ध भादंवि ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.

Web Title: Beating a young man out of an old argument