मित्राला ‘मंग्या’ का म्हटले म्हणून पत्नीला बेदम झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 20:37 IST2022-07-15T20:35:01+5:302022-07-15T20:37:52+5:30
Nagpur News मित्राला उद्देशून मंग्या हे टोपणनाव म्हटल्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली असून पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे.

मित्राला ‘मंग्या’ का म्हटले म्हणून पत्नीला बेदम झोडपले
नागपूर : मित्राला उद्देशून मंग्या हे टोपणनाव म्हटल्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. यात पत्नी जखमी झाली असून पतीविरोधात तिने तक्रार दाखल केली आहे. जरीपटका पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागृत नगर येथे राजू शंभरकर आपल्या आई-वडील, पत्नी व मुलासोबत राहतो. रात्री दारू पिऊन घरी आल्यानंतर मुलाच्या अभ्यासाच्या मुद्द्यावरून त्याने पत्नीला रागवायला सुरुवात केली. तू मुलाकडे लक्षच देत नाही म्हणून तो अभ्यासात मागे पडत आहे, असे म्हटल्यावर त्याने त्याचा मित्र मंगेशसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबतची माहिती दिली. यावर पत्नीने ‘त्या मंग्यासोबत बिझनेस का करता’ असा प्रश्न केला. मित्राला मंग्या का म्हटले असा सवाल करत राजूने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी त्याने परत तोच मुद्दा उकरून काढत परत बेदम मारहाण केली. सहनशक्तीचा अंत झाल्याने अखेर पत्नीने जरीपटका पोलीस ठाणे गाठले व पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.