क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:15+5:302021-06-02T04:08:15+5:30
कळमेश्वर : घराशेजारी राहणाऱ्या आराेपीने क्षुल्लक कारणावरून एकाला मारहाण करीत जखमी केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमजी ...

क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण
कळमेश्वर : घराशेजारी राहणाऱ्या आराेपीने क्षुल्लक कारणावरून एकाला मारहाण करीत जखमी केले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील निमजी खदान येथे साेमवारी (दि.३१) येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
जतनसिंग लक्ष्मण राठाेड (३९, रा. निमजी खदान, ता. कळमेश्वर) असे जखमीचे नाव असून, हुशियार कटाेते (४०, रा. निमजी खदान) असे आराेपीचे नाव आहे. जतनसिंग हा घरी असताना, आराेपीने त्याला आवाज देऊन बाहेर बाेलाविले व त्यास शिवीगाळ करीत ‘तू माझ्या चुगल्या करताे’ असे म्हटले. यावर जतनसिंगने काेणाकडे चुगल्या केल्या, त्याला बाेलावून आण असे म्हटले असता, आराेपीने त्याच्या डाेक्यावर वीट मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार हिवरकर करीत आहेत.