शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

पोलिसांनो कठोर व्हा अन् नागरिकांनो सहकार्य करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 11:20 PM

कोविड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलीही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि नागरिकांनो, तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

ठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन आणि इशाराही : पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलीही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि नागरिकांनो, तुम्ही सहकार्य करा, असे आवाहन मनपा आयुक्ततुकाराम मुंढे यांनी केले.सोबतच नागरिकांनी ऐकले नाही तर कठोर पावले उचलावी लागतील आणि अधिकाऱ्यांनी कुचराई केली तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशाराही मुंढे यांनी दिला.गेल्या दोन दिवसात नागपूर शहरात एका विशिष्ट भागात वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त आणि निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात तुकाराम मुंढे यांनी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्रेहा करपे उपस्थित होते.या बैठकीत मुंढे यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. सतरंजीपुºयात रुग्ण आढळल्यानंतर तेथील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तेथील निर्बंध कडक केले. संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यामुळे आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मागील दोन दिवसातील रुग्णसंख्येने शतक पार केले. यातील बहुतांश रुग्ण मोमीनपुरा परिसरातील आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असले तरी येथून आवागमन काही प्रमाणात सुरू असल्याचे लक्षात आले. काल-परवा या क्षेत्राव्यतिरिक्त आढळलेला एक रुग्ण हा मोमीनपुरा क्षेत्रात जाणे-येणे करीत असल्याचे समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असेच जर अन्य नागरिकही करीत असेल तर हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. मनपा अधिकारी आणि पोलिसात समन्वय असायलाच हवा. या समन्वयातून यापुढे केवळ एक प्रवेश वगळता संपूर्ण क्षेत्र सील करा, असे निर्देश मुंढे यांनी दिले.तक्रार असेल तर येथे करा....!क्षेत्र प्रतिबंधित असले आणि कुणी काही तक्रारीचे कारण घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना मनपाचे. ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यास सांगा. अन्य काही अडचण असेल तर मनपाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यायला सांगा, असेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.तर थेट विलगीकरण कक्षात रवानगीमनपाचे जे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे, त्या क्षेत्राच्या बाहेर कुणीही यायला नको किंवा बाहेरची व्यक्ती आत जायला नको. तो मग कुणीही असो. कुठल्याही पदावर असो. जर तो पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर त्याची रवानगी थेट विलगीकरण कक्षात करा, असेही स्पष्ट निर्देश मुंढे यांनी दिले.मोमीनपुऱ्यात सकाळी १० ते ४ या वेळात अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडीमोमीनपुरात शनिवार ९ मे पासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. तसे आदेश मनपा आयुक्तांतर्फे निर्गमित केले आहेत. दुपारी ४ नंतर कुणीही रस्त्यावर दिसणार नाही, लोकांच्या आरोग्यासाठीच हे कडक निर्णय घेण्यात येत असून त्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.नागरिकांना भावनिक आवाहन आणि इशाराहीअत्यावश्यक सेवेत असणाऱ्याएका कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण आज घडले, जे अत्यंत वाईट आहे. स्वत: बिनधास्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीला मारहाण करणे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींची गय न करता सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या दिवसात नियंत्रण ठेवले नाही, तर अत्यंत वाईट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन संपलेला नसल्यामुळे घरातच राहावे आणि नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे भावनिक आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. जर नागरिकांनी आताही ऐकले नाही तर संपूर्ण शहरात संचारबंदी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या