शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवडणुकीसाठी सज्ज राहा: विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:03 IST

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्दे काँग्रेसची बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीने शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी केली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यात तत्पर तसेच सक्षम कार्यकर्त्यांची निवड प्रक्रिया राबविली जात आहे. अगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, मनपा पराभूत उमेदवार, व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक देवडिया काँग्रेस भवनात विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रदेश चिटणीस उमाकांत अग्निहोत्री, अ‍ॅड.अभिजित वंजारी, काँग्रेसचे प्रवक्ते विशाल मुत्तेमवार, मनपातील माजी विरोधी पक्षनेता संजय महाकाळकर, प्रशांत धवड, सरचिटणीस डॉ. गजराज हटेवार, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, प्रा. दिनेश बानाबाकोडे,रमण पैगवार,विवेक निकोसे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक आदी उपस्थित होते.बूथ अध्यक्ष हाअभ्यासू, निर्णयक्षमता असणारा असावा. मतदारांना परिचित असावा. ब्लॉक अध्यक्षांनी बूथ अध्यक्षाची निवड करताना सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. बूथ अध्यक्षांसह ११ जणांची कार्यकारिणीची यादी येत्या २० जूनपर्यंत द्यावी. असे निर्देश विकास ठाक रे यांनी ब्लॉक अध्यक्षांना दिले. ब्लॉक अध्यक्षाला सहा प्रमुखाची समन्वयक समितीदेखील बनवून देण्यात आली. यादी तयार झाल्यानंतर ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीला पाठविली जाणार आहे. बूथ प्रमुखांचा मेळावा जुलै महिन्याच्या प्रारंभी घेतला जाईल. यापुढेताकदीने आंदोलन करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.बैठकीला ब्लॉक अध्यक्ष पंकज निघोट, वैभव काळे, प्रभाकर खापरे, निर्मला बोरकर,अनिल पांडे, प्रकाश बांते, महेश श्रीवास, प्रभाकर खापरे, इर्शाद मलीक, सूरज आवळे,विवेश्वर अहिरकर, दिनेश तराळे, राजकुमार कमनानी, राजेश नंदनकर ,नगरसेवक रमेश पुणेकर,रश्मी धुर्वे,नितीन साठवणे,माजी नगरसेवक वासुदेव ढोके,फिरोज खान,प्रशांत कापसे, अशोक यावले, नरेश शिरमवार,प्रकाश ठाकरे,अर्चना बडोले,इर्शाद अली,प्रसन्ना जिचकार,स्नेहल दहीकर, मिलिंद सोनटक्के,कल्पना जोगे,जॉन थॉमस, विनोद नागदेवते, रवी गाडगे पाटील,राजेश कुंभलकर,अब्दुल शकील, धरम पाटील,अलोक मुन,रमेश मौदेकर,प्रीती साहारे,राजाभाऊ चिलाटे,सुनिता ढोले, किशोर गजभिये,आशीष नाईक,विनायक इंगोले,बॉबी दहीवाले,अजय नासरे,किशोर गीद,सुनील दहीकर,दिपक घाटोळे,अरविंद वानखेडे,रमेश चौकीकर,नरेश खडसे,पुरुषोत्तम पारमोरे, ज्ञानेश्वर ठाकरे,पंकज लोणारे, इर्शाद शेख, इमरान पठाण,संजय पेदाम,आशिफ शेख,अनिल सहारे, शंकर बनारसेसहित पदाधिकारी,नगरसेवक,पराभूत उमेदवार उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर