बावनकुळे यांनी घेतली अमित शाह व जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 22:20 IST2022-08-24T22:19:56+5:302022-08-24T22:20:27+5:30
Nagpur News भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भाजप राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.

बावनकुळे यांनी घेतली अमित शाह व जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट
नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भाजप राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली.
बावनकुळे यांनी भेट घेतली असता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि अन्य महत्त्वाच्या विषयांबद्दल मार्गदर्शन केले. जे.पी. नड्डा यांनी बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर झालेल्या या पहिल्या भेटीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींविषयी चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष, केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय कामगारमंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही बावनकुळे यांनी सदिच्छा भेट घेतली.